लंडन - दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये भरती झालेले ब्रिटिश जिहादी ब्रिटनमध्ये परतल्यास मुंबईतील 26/11प्रमाणे हल्ला होऊ शकतो. ब्रिटनची गुप्तचर संघटना एमआय पाचने खुलासा केला आहे. इस्लामिक स्टेट ब्रिटनमध्ये जिहादची सुरुवात करु शकतात, असे गुप्तचेर विभागाने सांगितले आहे. तसेच लंडन, बर्मिंगहॅम आणि मॅचेस्टरच्या उच्चभ्रू भागातील इमारती लक्ष्य केले जाईल, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
तज्ज्ञांनुसार दहशतवादी, शिपिंग कंटेनर्सच्या साहाय्याने ब्रिटनमध्ये शस्त्रास्त्र आणि स्फोटकांची तस्करी करित आहे. त्याचा वापर ब्रिटनवर हल्ला करण्यासाठी होणार आहे.
ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुनने इस्लामिक स्टेटच्या हिंसक कारवाईंवर चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाच्या राजाने प्रसिध्द केलेल्या प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे की, जिहादी, अमेरिका आणि युरोपला लक्ष्य करु शकते. जर याकडे दुर्लक्ष झाल्यास एका महिन्याच्या आत दहशतवादी, युरोप आणि अमेरिकेत पोहोचू शकतात. त्यांना माणूकीची भाषा कळत नाही. त्यांनी आतापर्यंत अनेक निष्पाप लोकांची हत्या केली आहे, असे राजा अब्दुल्ला यांनी पत्रकात सांगितले.
लंडन - दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये भरती झालेले ब्रिटिश जिहादी ब्रिटनमध्ये परतल्यास मुंबईतील 26/11प्रमाणे हल्ला होऊ शकतो. ब्रिटनची गुप्तचर संघटना एमआय पाचने खुलासा केला आहे. इस्लामिक स्टेट ब्रिटनमध्ये जिहादची सुरुवात करु शकतात, असे गुप्तचेर विभागाने सांगितले आहे. तसेच लंडन, बर्मिंगहॅम आणि मॅचेस्टरच्या उच्चभ्रू भागातील इमारती लक्ष्य केले जाईल, अशी शंका उपस्थित केली जात आहे. तज्ज्ञांनुसार दहशतवादी, शिपिंग कंटेनर्सच्या साहाय्याने ब्रिटनमध्ये शस्त्रास्त्र आणि स्फोटकांची तस्करी करित आहे. त्याचा वापर ब्रिटनवर हल्ला करण्यासाठी होणार आहे.