आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Terrorist School In Syria Training Children

सीरियात ISIS देत आहे लहान मुलांचा दहशतवादाचे ट्रेनिंग, पाहा Photo

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: नाझी स्टाइलमध्ये मुलांना शस्त्र चालवण्याचे ट्रेनिंग देताना ISISचा कमांडर)

दमिश्क- सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये इस्लामिक स्टेटने सुरु केलेल्या दहशतवादी ट्रेनिंग स्कूलचे काही छायाचित्रे समोर आले आहेत. यात लहान मुलांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

'कॅलिफेट कब्स' नामक छायाचित्रात जवळपास 10 वर्षे वयोगटातील मुले आर्मीच्या ड्रेसमध्ये दिसत असून त्यांच्या हातात धोकादायक शस्त्रे दिसत आहेत. तसेच सगळ्या मुलांचा चेहरा काळ्या मास्कने झाकलेला असून त्यांच्या मागे इस्लामिक स्टेटचे बॅनरही लावले आहे.

दमिश्कमध्ये इस्लामिक स्टेटने दहशतवादी ट्रेनिंग स्कूल सुरु केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी सीरियातील अनेक भागात कॅम्प उभारले होते. त्यात इस्लामिक स्टेटचे दहशतवादी मुलांना दहशतदाचे धडे देत होते.

हाय क्वॉलिटी रेझोल्युशन असलेली छायाचित्रे 'जस्टपेस्ट डॉट इट' वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे.

एका छायाचि‍त्रात एक दहशतवादी मुलांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देताना दिसत आहे. त्यांच्या मागे एक मिनी बस उभी आहे. त्यावर इस्लामिक स्टेटचा झेंडा लावल्याचे दिसत आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करूनच पाहा, लहान मुलांना शस्त्र चालवण्याचे ट्रेनिंग देताना इस्लामिक स्टेटचे दहशतवादी...