आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS कडून पुन्हा 300 यझीदींची हत्या, 1000 महिला - मुलांना केले बंदिवान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराकमध्ये आयएसआयएस (इस्लामिक स्टेट) दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा यझीदी समुदायाच्या लोकांना निशाणा बनविले आहे. आयएसआयसने 300 लोकांचा नरसंहार केला आहे. त्याशिवाय एक हजाराहून अधिक महिला अणि मुलांना बंदी बनविले आहे. दहशतवाद्यांनी याआधी एका दिवसापूर्वी 80 आणि त्याआधी जवळपास 500 यझीदींची हत्या केली होती. तेव्हा काही लोकांना त्यांनी जिवंत गाडले होते.
युवकांना शेतात नेऊन घातल्या गोळ्या
कुर्दिश अधिकार्‍यांच्या सांगितले, की आयएसआयएसने इराकच्या कोचो गावात हा नरसंहार केला. किर्दिश सरकारचे वरिष्ठ अधिकारी हामिद दरबंदी यांनी संडे टाइम्सला सांगितले, 'जिहादींनी बंदिवानांची दोन गटात विभागणी केली. यातील वृद्धांची हत्या एका शाळेच्या परिसरात केली. दुसर्‍या गटात तरुण पुरुष होते. त्यांना गावा बाहेर शेतात घेऊन गेले आणि तिथे त्यांना गोळ्या घातल्या.' चर्चा आहे, की आयएसआयएस यझीदींना इस्लाम स्विकारण्याचे नाहीतर मृत्यूला सामोरे जाण्याची धमकी देत आहे.
चहूकडे मृतदेहांचा खच
कोचो गावकर्‍यांच्या संपर्कात असलेल्या एका यझीदी कार्यकर्त्याने सांगितले, 'दहशतवाद्यांनी केलेल्या नरसंहारावेळी एक युवक जीव वाचवण्यात यशस्वी झाला. त्याने स्वतःला एका मृतदेहाखाली झाकून घेतले होते.' यझीदी मोहसेने या युवकाने म्हटले आहे, की मी जेव्हा कोचो गावात आलो तेव्हा येथे फक्त मृतदेह विखूरलेले दिसत होते.
महिला आणि मुलांना केले बंदीवान
300 यझीदींची हत्या करण्या बरोबरच दहशतवाद्यांनी 1000 महिला आणि मुलांना बंदीवान बनून ठेवले आहे. आयएसआयएसचे दहशतवादी त्यांना कुठे घेऊन गेले याची कोणालाही माहिती नाही. दिनाई यांच्या म्हणण्यानुसार, बंदीवान महिलांसोबत 10-10 वर्षांची मुले देखील आहेत. त्यांना तल अफर येथे नेण्यात आल्याची शक्यता आहे. हे शहर सध्या आयएसआयएसचा बालेकिल्ला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, इराकमधी ताजी स्थिती...