आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Terrorists News In Marathi, America, Divya Marathi, Iraq

अमेरिकेने इराकमधील दहशतवादी तळांवरील हल्ले केली तीव्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेने इराकमधील आयएसआयएसच्या संशयित दहशतवादी तळांवरील हवाई हल्ले आणखी तीव्र केले आहेत. इराकी व कुर्द सैन्यासोबत शनिवारी केलेल्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर हवाई हल्ले करून त्यांची 14 सशस्त्र वाहने नष्ट केली. यात इरबिल व मोसुल बांध परिसरातील ठिकाणांना लक्ष करण्यात आले.
पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार 9 हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांच्या हत्यारबंद गाड्या नष्ट करण्यात आल्या. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला होता. अमेरिकेने या हल्ल्यांसाठी कुर्द सैनिकांची मदत घेतली. या पथकने सुन्नी दहशतवाद्यांना मोसुल धरण व परिसरातून मागे हटवले. त्यामुळे या धरणावर पुन्हा ताबा मिळवणे शक्य झाले.