फोटो - ISIS ने प्रसारित केलेल्या व्हिडिओतील छायाचित्र.
रक्का - इस्लामिक स्टेटने दोन जपानी बंधकांचा व्हिडिओ प्रसारीत केला आहे. त्यांच्या प्राणाच्या मोबदल्यात जपानच्या सरकारकडे 20 कोटी डॉलर म्हणजेच 1236 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. रक्कम न मिळाल्यास 72 तासांत बंधकांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
याआधीच्या व्हिडिओ प्रमाणेच यातही काळ्या कपड्यात जिहादी आणि नारंगी कपड्यांत बंधक दाखवण्यात आले आहेत. जपानी बंधकांमध्ये पत्रकार केन्जी गोटो जोगो आणि मिलिट्री कंपनी ऑपरेटर हारुना युकाना यांचा समावेश आहे.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी शपथग्रहण केल्यानंतर दोन दिवसांत हा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी ISIS च्या विरोधात लढा देण्यासाठी बिगरलष्करी सहाय्य देण्याची तयारी दर्शवली होती. इस्लामिक स्टेटने त्यांच्या विरोधात अमेरिकेच्या नेतृत्त्वातील लढ्याला जपान स्टेटने दाखवलेल्या पाठिंब्याचीही टीका केली आहे. दरम्यान, याबाबत
आपल्याला माहिती असून त्याबाबत काहीही बोलायचे नसल्याचे जपानचे म्हणणे आहे.
व्हिडिओमध्ये दिसणारा जिहादी जॉन याने यापूर्वी डेव्हीड हेन्स, अॅलन हॅनिंग, जेम्स फोले आणि स्टीव्हन सोटलॉफ या परदेशी पत्रकारांची जैसे विदेशी पत्रकारांच्या हत्या केल्या आङेत. इस्लामिक स्टेटच्या ताब्यात ब्रिटिश बंधक जॉन केंटली असल्याचे काही व्हिडिओत दिसून आले आहे. तज्ज्ञांच्या मते दहशतवादी त्याच्याकडून बळजबरी अशी कामे करून घेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTO आणि अखेरच्या स्लाइड्वर VIDEO