आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Throwing Men Off Of The Roof Of A Building For Allegedly Being Gay

समलैंगिक संबंधाच्या आरोपावरून एकाला फेकले इमारतीवरून खाली, नंतर टाकाला दगड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: समलैंगिक असल्याचा आरोपावरून एकाला इमारतीवरून खाली फेकताना ISIS चे दहशतवादी)

बगदाद- इराकमधील निनेवाह प्रांतात एका व्यक्तीवर समलैंगिक संबंधाचे आरोप करून त्याला उंच इमारतीवरून खाली फेकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर नंतर त्याच्या डोक्यावर दगड टाकण्यात आले आहेत. हे कृत्य इस्लामिक स्टेटच्या (आयएसआयएस) दहशतवाद्यांनी केले आहे. पत्रकार जैद बेंजामिन याने आपल्या टि्वटर अकाउंटवर (@zaidbenjamin) वर ISIS च्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रुरकृत्याची छायाचित्रे पोस्ट केली आहेत.

बेंजामिन याने दिलेल्या माहितीनुसार, निनेवाह प्रांतातील दोन जणांवर समलैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप होता. ISIS ने दोघांना आपल्या ताब्यात घेतले. नंतर एकाला इमारतीवरून फेकल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केले. मात्र, दुसर्‍या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मागील दोन महिन्यांपासून समलैंगिकतेच्या मुद्यावरून ISIS ने पाच जणांची हत्या केली आहे. दुसरीकडे, दहशतवाद्यांनी निनेवाह प्रांतातील दोघांवर खुलेआम गोळ्या झाडल्या होत्या. दोघांवर चोरीचा आरोप होता.

पत्रकार जैद बेंजामिन याने अपने टि्वटर अकाउंट @zaidbenjamin वर पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये दोन दहशतवादी एका व्यक्तीला उंच इमारतीवरून खाली फेकताना दिसत आहेत. इमारतीखाली 100 पेक्षा जास्त लोक दिसत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी निनेवाह प्रांतात एक महिलेवर व्यभिचार केल्याचा ठपका ठेवून तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याचे फर्मान ISIS च्या दहशतवाद्यांनी सोडले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून बघा, ISIS चे क्रुरकृत्य...