आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Throws Man Off Roof To His Death For Being Gay

इस्लामिक स्टेटने समलैंगिकाला इमारतीवरुन फेकले, दगडांनी ठेचून मारण्याची दिली शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इस्लामिक स्टेटने (आयएसआयएस) पुन्हा एकदा क्रुर कृत्य केले आणि त्याचे फोटो पोस्ट केले आहे. डेलिमेलच्या वृत्तानुसार, इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी एका उंच इमारतीवरुन समलैंगिकतेचा आरोप असलेल्या व्यक्तीला ढकलून दिले. इस्लामिक स्टेटने समलैंगिकतेच्या मुद्यावरून एका महिन्यात केलेली ही तिसरी हत्या आहे. तर, दुसरीकडे आयएसआयएसचे हे कृत्य CIA कडून दहशतवाद्यांसाठी वापरण्यात येणार्‍या टॉर्चर टेक्निकच्या खुलाशानंतर दिलेले उत्तर मानले जात आहे.
दहशतवाद्यांनी या घटनेचे फोटो जिहादी वेबसाइटवर अपलोड केले आहेत. छायाचित्रांमध्ये दिसते, की समलैंगिकतेचा दोषी असलेल्या व्यक्तीला बिल्डिंगवरुन खाली फेकले तेव्हा तिथे आठ दहशतवादी होते. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, विलायत-अल-फुरत (सिरीया आणि इराकच्या सीमेवरील शहर) येथे एका व्यक्तीला समलैंगिक असल्याचे दोषी ठरविल्यानंतर त्याला शहरातील सर्वात उंच इमारतीवरुन फेकून देण्याचे फर्मान सोडले. त्याचबरोबर त्याला दगडांनी ठेचून मारण्याचा आदेश कोर्टाने दिला. आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी या शहरात एका सार्वजनिक ठिकाणी बलात्कार करणार्‍या तीन आरोपींची हत्या केल्यानंतर त्यांना दोरीने टांगण्यात आले. त्यांचीही छायाचित्रे वेबसाइटवर अपलोड केली गेली आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, दहशतवाद्यांनी अपलोड केलेली आणखी छायाचित्रे