आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Upload Video To Show Beheading Of US Journalist, Latest News In Marathi

पुन्हा घडले Daniel Pearl: ISIS ने अमेरिकी पत्रकाराचे शीर कचाकचा कापले, बघा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅन्ड सीरियाच्या (आयएसआयएस) दहशतवाद्यांनी मंगळवारी एक व्हिडिओ जाहीर केला. त्यात 2012 पासून बेपत्ता असलेल्या एका अमेरिकन पत्रकाराचे शीर कलम केल्याचे दाखवण्यात आले आहे. अमेरिकेने इराकवरील हवाई हल्ले त्वरीत बंद केले नाहीत तर ताब्यात असलेल्या आणखी एका अमेरिकन पत्रकाराची हत्या केली जाईल, अशी धमकीही दिली आहे.
जेम्स फोले असे पत्रकाराचे नाव आहे. तो 'फ्रीलान्स पत्रकार' होता. जेम्सला 22 नोव्हेंबर 2012ला सीरियात शेवटचे पाहिले गेले होते. सिरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांच्या लष्कराने त्याला कैद केले असावे, असा अंदाज लावण्यात आला होता.

आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी यूट्यूब आणि अल फुर्कान मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडिओ चार मिनिटांचा आहे. अमेरिकन अॅथॉरिटीकडून संबंधित व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. यासोबत व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीचे शिर कलम करण्‍यात आले आहे. त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

"मी तो व्हिडिओ पाहिला आहे. त्यात आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी पत्रकार जेम्स फोले ची गळा चिरुन हत्या केल्याचा दावा केला आहे. मात्र, याबाबत चौकशी सुरु असून चौकशी पूर्ण झाल्यानंतरच बोलणे योग्य ठरेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नॅशनल सेक्युरिटी काउंसिलला सांगितले आहे.

पुढ‍ील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, आयएसआयएसने जारी केलेला व्हिडिओ....