आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Isis Vs Al Qaeda Both Competing Each Other, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्लामिक स्टेट Vs अल कायदा: दोघांमध्‍ये लागली स्पर्धा, ISIS चे दहशतवादी No.1

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्र : अल कायदा प्रमुख अयामान अल-जवाहिरी आणि ISIS प्रमुख अबु बक्र अल बगदादी)

कुप्रसिध्‍द दहशतवादी संघटना अल कायदापासून स्वातंत्र झाल्यानंतर इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल-शाम ( आयएसआयएस) दुसरी जिहादी महाशक्ती बनली आहे का ? आयएसआयएसने इराक आणि सीरियाच्या भूमीवर नियंत्रण आणि मोठ्याप्रमाणावरील नरसंहार केले आहे. त्यामुळे अल कायदाच्या कपाळावर आट्या पडल्या आहेत. याच कारणामुळे अल कायदाने आपले दहशत कायम राखण्‍याकरिता भारतीय उपखंडात आपल्या नव्या शाखेची घोषणा केली आहे. कायदाचे प्रमुख अयामान अल-जवाहिरी म्हणाले की, नवी शाखा इस्लामी राज्याला प्रोत्साहन देईल. बरोबरच भारतीय उपखंडात जिहादचा झेंडा फडकावेल.

अल कायदा 9/11 प्रमाणे हल्ला करण्‍याच्या तयारीत आहे. अमेरिकेत 9/11 च्या 13 व्या स्मृतीदिनी पुन्हा एकदा हल्ला होण्‍याची शक्यता वॉशिंग्टन फ्री बीकनने वर्तवली आहे. दहशतवाद्यांनी लीबियातील 11 व्यापारी विमाने चोरली आहेत. या विमानांचा वापर 9/11 प्रमाणे हल्ल्यासाठी होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्‍यात आली आहे. 'मास्क्ड मॅन ब्रिगेड' ने ती चोरली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दहशतवादी संघटनेचे लागेबंध अल-कायदा आणि अन्सर अल शरियाशी असल्याचे बोलले जात आहे. इस्लामिक स्टेटच्या (आयएस) रडारवर अमेरिका आहे. अमेरिकेचा पत्रकार जेम्स फोलेनंतर स्टीव्हन सोटलॉफचेही शिरच्छेद करण्‍यात आले. आयएसने 'अ सेकंड मॅसेज टू अमेरिका' नावाचे प्रसिध्‍द केलेल्या व्हिडिओत ' गंभीर इशारा दिल्यानंतरही परराष्‍ट्र धोरणात कोणतेही बदल झालेले नाही. तुम्ही आमच्या लोकांवर क्षेपणास्त्र डागत रहा, आम्ही तुमच्या लोकांचे शिरच्छेद करत राहणार. दहशती कारवायांवरुन दोन्ही गटात स्पर्धा चालू आहे.

9/11 नंतर अल-कायदापासून आयएसआयएसची निर्मिती झाली. 2013 पर्यंत अल- कायद्याशी अनेक छोटी-मोठी दहशतवादी संघटना जोडल्या गेल्या होत्या. परंतु इस्लामिक स्टेटच्या वाढीबरोबरच इतर संघटनांनी अल-कायदाकडे पाठ फ‍िरवली. आयएसआयएसच्या पुढे कायदाचे वयस्कर ( जवाहिरी) नेत्यांना संघटना चालवणे अशक्य झाले आहे, असे दहशतवाद बाबतचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

पुढे वाचा... कधीकाळी आयएसआयएस अल कायदाचा भाग होता..