आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरच्छेद करण्याआधी ISIS ने अमेरिकन पत्रकाराच्या घरी पाठवलेला E-mail वाचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - दहशतवादी संघटना आयएसआयएसने अमेरिकन पत्रकार जेम्स फॉली यांच्या मुक्ततेसाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती. त्यासोबतच पाकिस्तानी डॉक्टर आफिया सिद्दीकीला देखील सोडण्यास सांगितले होते. अमेरिकेचे ऑनलाइन वृत्तपत्र 'ग्लोबल पोस्ट'च्या वृत्तात हा दावा करणयात आला होता.
डॉ. आफिया सिद्दीकी न्यूरोसर्जन आहे. तिने मॅस्च्यूसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. तिच्यावर दहशतवादी संघटना अल-कायदासोबत संबंध ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 2010 मध्ये आफियाला अफगाणिस्तानात अमेरिकन कर्मचार्‍याच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात 86 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आफियाने 9/11 हल्ल्याचा मास्टर माइंड खालिद शेख मोहम्मद याच्या एका नातेवाइकोसोबत लग्न केल्याचे देखील बोलले जाते.
ऑनलाइन वृत्तपत्राने फॉली यांच्या कुटुंबियांच्या परवानगीने आयएसआयएसने 12 ऑगस्ट रोजी त्यांना पाठवलेला इ-मेल प्रकाशित केला आहे. हा केवळ इ-मेल नाही, तर हे आयएसआयएस काय-काय करु शकते याची साक्ष पटवून देणारे धमकीचे पत्र आहे.
अमेरिकेचे सरकार आणि मेंढरांसारख्या त्यांच्या नागरिकांसाठी संदेश :
तुम्ही इराकमध्ये ज्या पद्धतीने तोंडावर आपटले त्यामुळे आम्ही तुम्हाला माफ केले आहे. आम्ही तुमच्या देशावर किंवा नागरिकांवर कधीही हल्ला केला नाही, याचा अर्थ आम्ही असे करु शकत नाही असा नाही. तुमच्यावर हल्ला करण्याची आमच्यात ताकद आहे. तुमच्या समाजातील काही नीच लोक आमच्या कैदेत आहेत. त्यातील काहींनी वाघाच्या जबड्यात हात घालण्याचा प्रयत्न केला आणि मृत्यूलाच बोलावणे पाठवले. आम्ही पैशांच्या बदल्यात तुमच्या लोकांची सुटका करुन घेण्याची संधी दिली होती. जी दुसर्‍या काही सरकाने मान्य केली. आम्ही आमच्या बहिणीसमान मुसलमान कैदी आफिया सिद्दीकी यांच्या सुटकेसाठी तुमच्या काही लोकांना सोडण्याचाही प्रस्ताव दिला होता. मात्र, तुम्ही फार वेळ न दवडता यात तुम्हाला फार रस नसल्याचे दाखवून दिले.
मुसलमानांसोबत डील करण्यासाठी तुम्हाला सामोपचाराची भाषा येत नाही. यासाठी तुम्हाला फक्त बंदूकीचीच भाषा येते. लक्षात ठेवा, तुम्ही इराकच्या जमीनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही तुम्हाला अरबी अनुवादात एक संदेश पाठविला होता. आता तुम्ही पुन्हा एकदा मुसलमानांचा खात्मा करण्यासाठी इराकमध्ये परतत आहात. यावेळी तुम्ही हवाई हल्ले सुरु केल आणि पळपूट्यांसारखे समोरा-समोर लढण्यास घाबरले. आज आमच्या तलवारीचे पाते तुमच्या दिशेने आहे. जोपर्यंत तुमच्या रक्ताने आमची तहान भागत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. तुम्ही आमच्या अबला महिलांना आणि मुलांना, वृद्धांना देखील सोडलेले नाही. तुम्हाला तुमच्या हवाई हल्ल्याची किंमत मोजावी लागेल. त्या दिशेने अमेरिकन नागरिक जेम्स फॉलीची हत्या हे पहिले पाऊल आहे. आमच्या बद्दलच्या तुमच्या भूमिकेची किंमत तो मोजत आहे.

पुढील स्लाइडमध्ये, पत्रकार जेम्स फॉली यांची सीरिया आणि लिबीया येथील रिपोर्टींग दरम्यानची काही छायाचित्रे... आणि त्यांच्या छळाची कहानी
संग्रहित छायाचित्र - आफिया सिद्दीकी