आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपबीती : इराकमधील नर्सेसना ताब्यात घेण्याचा ISIS च्या दहशतवाद्यांचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराकच्या अनेक भागांवर ताबा मिळवलेल्या आयएसआयएस संघटनेच्या दहशतवाद्यांनी तिकरितमध्ये अडकलेल्या 46 भारतीय नर्सेसना मोसूलला नेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मात्र नर्सेसनी नकार दिल्यामुळे हा प्रकार टळल्याचे समोर आले आहे.
या नर्स सध्या तिकरित येथील एका रुग्णालयात अडकलेल्या आहेत. यापैकी दोन नर्सेसनी एका इंग्रजी वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली. आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी मंगळवारी त्यांच्याशी संपर्क केला होता. रुग्णालयासमोर एका बसमध्ये काही लोक आले होते. त्यांनी या नर्सेसना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी आल्याचे सांगितले. पण ते आयएसआयएसचे दहशतवादी होते. त्यांनी आपण सरकारचे प्रतिनिधी असल्याचे सांगत सोबत येण्यास सांगितले. नर्सेसने दिलेल्या माहितीनुसार या सर्वांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यांच्या हातात बंदुका होत्या. त्या दहशतवाद्यांनी नर्सेसना आपसांत चर्चा करून सोबत जाण्याबाबत एका तासात निर्णय घ्यायला सांगितले. मात्र, नर्सेसनी भारतीय दुतावासात अधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी नर्सेसना तिकरितमध्येच थांबण्यास सांगितले. त्यानंतर नकार मिळाल्याने ते दहशतवाही निघून गेले, अशी माहिती नर्सेसनी दिली.
इराकी सैन्य दहशतवाद्यांना पिटाळून लावण्यासाठी बॉम्बहल्ले करत असल्याचे नर्सेसने सांगितले. आयएसआयएसने ताबा मिळवला असला तरी रुग्णालयात आवश्यक त्या सामानाची कमतरता भासली नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच संघटनेचे लोक रुग्णालयात असले तरी ते काहीही नुकसान पोहोचवत नसल्याचेही त्या म्हणाल्या.
फोटो - दहशतवाद्यांना पिटाळून लावल्यानंतर आनंद व्यक्त करणारे इराकचे सैनिक.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा इराकची ताजी छायाचित्रे...