आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamabad Court Suicide Attack News In Marathi, 11 Dead, 24 Injured

पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला; न्यायाधीशांसह 11 ठार, 25 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानातील इस्लामाबादच्या एफ-8 सेक्टरमधील कोर्ट परिसर आज (सोमवार) दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात एका न्यायाधीशांसह 11 जणांचा मृत्यु झाला आहे तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी काहीची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत कोर्ट परिसरात प्रवेश केला. तसेच ग्रेनेडही फेकले. प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही दहशवाद्यांनी ग्रेनेडने स्वतला उडवून घेतले. या हल्ल्यात अतिरिक्त न्याया‍धीश रफाकत अवान यांचा मृत्यू झाला आहे.

इस्लामाबाद कोर्ट परिसरातील हल्ला हा आत्मघातकी असल्याचे पोलिस महासंचालक सिकंदर हयात यांनी सांगितले. हल्ल्यानंतर कोर्ट परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून आजच्या सुनावण्या आणि कोर्टाची सर्व कामे रद्द करण्यात आली आहेत

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, इस्लामाबाद शहर सुरक्षितच- गृहमंत्री