आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Announces Its Own Islamic Currency

आता इस्लामिक स्टेट आणणार स्वत:चे चलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराक आणि सीरियामध्‍ये सक्रिया दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने आपले स्वातंत्र चलन आणण्‍याची घोषणा केली आहे. जागतिक आर्थिक व्यवस्था नष्‍ट करण्‍यासाठी लवकरच स्वत:चे चलन सुरु करणार आहे, असे संघटनेने सांगितले. जगातील सर्वात हिंसक आणि श्रीमंत दहशतवादी संघटना आयएसआयएसने गुरुवारी( ता. 13) जुने इस्लामिक चलन दीनार अर्थव्यवस्थेत आणणार असल्याची घोषण केली आहे. सोने आणि चांदीची नाणी हे अल्लाहला समर्पित असतील. स्वयं घोषित इस्लामिक स्टेटच्या वित्त विभागानुसार लवकरच चलन विनिमय दर प्रसिध्‍द केला जाणार आहे.

मुस्लिमांचे तिसरे खलिफा उस्मान बिन अफ्फानच्या ( इसवी सन पूर्व 634) कालखंडातील चलन व्यवस्था अंमलात येणार आहे. त्यात मिंट नाणी, दोन सुवर्ण, तीन चांदी आणि दोन तांब्याची नाणी यांचा समावेश होता. यातील सोन्याच्या एका नाण्यावर गव्हाच्या ओंब्या आणि दुस-यावर जगाचा नकाशा आहे. सर्वात महागड्या सोन्याच्या नाण्याचे मूल्य 694 डॉलर आहे.