आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: जपानी ओलिसाचा अखेर शिरच्छेद, ISIS ची जपानवर हल्ल्याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अम्मान/टोकियो - इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी अखेर जपानी पत्रकार केंजी गोटो याचा शिरच्छेद केला. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सुटकेसाठी जपान सरकारने चालवलेले प्रयत्न फोल ठरले. शनिवारी आयएसने हा व्हिडिओ जाहीर केला. "ए मॅसेज टू गव्हर्नमेंट ऑफ जपान' नावाने जाहीर करण्यात आलेल्या या व्हिडिओत ब्रिटिश लकबीत इंग्रजी बोलणारा अतिरेकी दाखवण्यात आला असून एक मिनिटाच्या या व्हिडिओत पत्रकार गोटो गुडघे टेकवून बसलेला दाखवण्यात आला आहे.

यापूर्वी आयएसने ज्या ओलिसांच्या हत्या केल्या व व्हिडिओ जाहीर केले त्यात असलेला अतिरेकीच गोटोसोबत आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये आयएसने गोटोचे अपहरण केले होते. जपानी नागरिक हारुना युकावा याची सिरियातून सुटका करण्यासाठी गोटो गेला होता. मात्र, तोच आयएसच्या जाळ्यात अडकला.

जॉर्डनच्या ओलिसावरून संभ्रम : सध्या आयएसच्या ताब्यात असलेला आणखी एक ओलिस व जॉर्डनचा पायलट मुआथ अस कसास्बेह याचा नव्या व्हिडिओत कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे त्याच्या जीविताबाबत संभ्रम आहे. केंजी आणि मुआथ यांना सोडण्याची तयारी दर्शवून आयएसने जिहादी नेता साजिदाच्या सुटकेची मागणी केली होती. यासाठी शुक्रवारपर्यंत मुदतही दिली होती. यावर जॉर्डन सरकारने आपला पायलट सुरक्षित असल्याचे ठोसपणे सांगितले तर साजिदाची सुटका करू, अशी अट घतली होती. साजिदा सध्या दहशतवादी हल्ल्याच्या आरोपावरून जॉर्डनच्या तुरुंगात आहेे.आयएसने सिरियातील कोबानीमध्ये प्रथमच आपला पराभव मान्य केला आहे. व्हिडिओत आयएसने म्हटले आहे.

जपानला धमकी
जाहीर करण्यात आलेल्या व्हिडिओत हा अतिरेकी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांचे नाव घेऊन म्हणतो, "अॅबे, जे युद्ध तुम्ही कधीही जिंकू शकणार नाहीत त्यात तुम्ही उतरलात. म्हणूनच केंजीच मारला गेला असे नव्हे, आता जेथे-जेथे जपानी नागरिक असतील तेथे आम्ही हल्ले करू.'
पुढील स्लाईडवर बघा, पत्रकार गोटोची हत्या करतानाचा ISIS ने जाहीर केलेला व्हिडिओ...