आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Crowd Stomp Syrian Soldiers To Death

ISISने सैनिकांना केले बेभान जमावाच्या स्वाधिन, मृतदेह बाइकला बांधून शहरभर नेले फरफटत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्का - इराक आणि सीरियामधील काही भागांवर ताबा मिळवणारी दहशतवादी संघटना आयएसआयएसने त्यांच्या क्रूरतेचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात सीरियातील रक्का शहरामध्ये तीन बंदीवानाची सैनिकांनी अत्यंत अमानुषपणे हत्या केली, हे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. सीरियाच्या तीन सैनिकांना बंदीवान करुन ठेवण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. एक दहशतवादी माइकवर तीन सैनिकांनी केलेल्या अत्याचाराची माहिती देत आहे, आणि गर्दीला चेतवीत आहे. त्यानंतर बेभान झालेली जमावाने लाथा-बुक्या मारून सैनिकांचा जीव घेतला. एवढ्यावरच आयएसआयएसचे अत्याचार थांबत नाही तर, त्या तीन सैनिकांचे मृतदेह मोटरसायकलला बांधून पूर्ण शहरातून फरफटत नेले जातात.
आयएसआयएसकडून माणुसकीला काळिमा फासणारी ही काही पहिली घटना नाही. इस्लामिक स्टेट शत्रूंची अतिशय क्रूरतेने हत्या करत आले आहे. याआधी पाश्चिमात्य देशातील पत्रकारांचा शिरच्छेद करण्यात आला होता. महिलांवर व्याभिचाराचा आरोप करुन त्यांची हत्या केली गेली आहे आणि शेकडो लोकांना एका रांगेत उभे करुन त्यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत.
पुढील स्लाइड मध्ये पाहा, इस्लामिक स्टेटने पोस्ट केलेला व्हिडिओ