आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Delegation Visit Pakistani Militant

इस्लाम‍िक स्टेटची पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी हात मिळवणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेरा इस्माइल खाब( पाकिस्तान) - इस्लामिक स्टेटच्या ( आयएस) संपर्कात असल्याचे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जुनादुल्लाने सांगितले आहे. इस्लामिक स्टेटच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानच्या दक्षिण वझर‍िस्तानमधील नेत्यांची भेट घेतली असल्याची माहिती संघटनेचे प्रवक्ते फरहाद मारवातने दिली . बुधवारी( ता. 12) आयएसचे प्रतिनिधी नैर्ऋत्य बलूचिस्तान प्रांतात आले होते.
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांबरोबर हात मिळवणे हा या भेटी मागील उद्देश होता. जुनादुल्ला दहशतवादी संघटना तेहरिक-ए-तालिबन पाकिस्तानची एक शाखा आहे. दुसरीकडे ते‍हरिक-ए-तालिबानच्या प्रवक्त्याने याच महिन्यात इस्लामिक स्टेटबरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध नसल्याचे स्पष्‍ट केले होते. आयएसचा इराक आणि सीरियाच्या अनेक भागांवर नियंत्रण आहे.