आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता ISIS ने सुरू केले पोलिस स्टेशन, PHOTO मधून पाहा काम करण्याची पद्धत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शीर कापण्यापासून ते सामुहिर हत्येसारखी कृत्ये करणा-या ISIS या दहशतवादी संघटनने त्यांचे सरकार स्थापन केले आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सुन्नी दहशतवाद्यांच्या या संघटनेने वीज पाण्यापासून वेतन देणे, ट्राफिक कंट्रोल, जेल, कोर्ट, मदरसे एवढेच नव्हे तर बँकाचे कामही सुरू केले आहे.
फोटोत दिसत असल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे पोलिस स्थानकही सुरू केले आहे. त्याठिकाणी ISIS चे सदस्य शहराच्या बंदोबस्तात तैनात आहेत. सुन्नी दहशतवाद्यांनी याठिकाणी एक तुरुंगही तयार केले असून, त्याठिकाणी आरोपींना ठेवण्यात येत आहे. इस्लामिक स्टेटमध्ये खलिफा अबू बक्र अल बगदादी यांचा आदेश न मानणा-यांना फासावर लटकवले जात असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

इस्लामिक स्टेटमध्ये महिलांनी शरिया कायद्याचे सक्तीने पालन करावे यासाठी खास अल-खान्सा ब्रिगेड तयार करण्यात आले आहे. त्यात केवळ महिला आहेत. शरिया कायद्याचे उल्लंघन करणा-या महिलांना शिक्षा देणे हे त्यांचे काम आहे.

पुढील छायाचित्रांमधून पाहा, इस्लामिक स्टेटमधील पोलिसांचे काम
स्रोत : live leak