आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Leader Abu Bakr Al Baghdadi Wounded In Airstrike

अमेरिकेच्या हल्ल्यात ISIS प्रमुख बगदादीचा मृत्यू, अमेरिकेचे मात्र मौन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेट प्रमुख अबु बकर अल-बगदादी गंभीर जखमी झाला होता. इराकच्या लष्काराने याला दुजोरा दिला होता. लढाऊ विमानांनी उत्तर इराकच्या मोसुल येथे दहशतवाद्यांच्या 10 वाहनांवर बॉम्ब हल्ले केले. या वाहनांमध्ये इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अल-बगदादीसह अनेक बडे नेते मारले गेल्याचे वृत्त आहे. मात्र, पेंटागॉनच्या अधिकार्‍यांनी हा हल्ला आणि बगदादीच्या जखमी होण्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
इराकच्या गृह आणि संरक्षण मंत्रालयाने बगदादी गंभीर जखमी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे वृत्त इराकच्या सरकारी वृत्तवाहिनीवरही प्रसारित करण्यात आले.
गुप्तचर संस्थांच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात 45 दहशतवादी अत्यंत गंभीर जखमी झाले होते. इराक सरकारने बगदादीचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा अब्दुल रहमान अॅलेफ्री देखील मारला गेला असल्याचे म्हटले आहे.
तर दुसरीकडे, इस्लामिक स्टेटने हल्ल्यात 11 दहशतवादी तरुण मारले गेल्याचे म्हटले आहे. त्यांनी बगदादी या ताफ्यात नसल्याचे म्हटले आहे. तो जखमी झाल्याचे वृत्तही खोटे असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
(संग्रहित छायाचित्र - अबु बकर अल-बगदादी)