आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Militants Claims Terrorist Group Killed One Japanese Hostage

जपानी ओलिसांपैकी एकाची अखेर हत्या, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाचे क्रोर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) संघटनेच्या अतिरेक्यांनी ओलिस ठेवलेल्या जपानच्या दोन नागरिकांपैकी एकाची हत्या केल्याचा व्हिडिओ जाहीर केला आहे. या हत्येमुळे जपान स्तब्ध असून या क्रौर्याने आपण नि:शब्द झालो आहोत, असे जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी म्हटले आहे.

रविवारी इसिसने दोन जपानी नागरिकांपेकी एकाची हत्या केल्याचा दावा करून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या नागरिकाचा शिरच्छेद केल्याचा दावा काळ्या वेशातील एक दहशतवादी करत असल्याचे व्हिडीओत दिसते. मृत नागरिकाचे नाव हरुणा याकुवा असे आहे. पंतप्रधान अॅबे यांनी या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला. याकुवा याच्यासह ४७ वर्षीय पत्रकार केंजी गोटो या दोघांचे इसिसच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी अपहरण केले होते.