आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State News In Marathi, Al quada, Divya Marathi

आयएसच्या भात्यात ३१ हजार क्रूर अतिरेकी, अल कायदानंतर ‘इसिस’चा सर्वात मोठा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अल-कायदानंतर जगाला डोकेदुखी ठरणाऱ्या व सध्या इराक, सिरियामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेला हिट लिस्टवर घेतल्यानंतर अमेरिकेने या संघटनेतील बारकावे टिपण्यास प्रारंभ केला आहे. अमेरिकी गुप्तहेर संस्था सीआयएनुसार आयएसकडे सध्या २० ते ३१ हजार उच्चशिक्षित पण क्रूर अतिरेक्यांची फौज आहे.

‘सीआयए’चे प्रवक्ते रेयॉन ट्रॉपनी यांच्यानुसार पूर्वी ही संख्या १० हजार मानली जात होती. मात्र, गेल्या मे महिन्यात प्राप्त मािहतीनुसार आता ३१ हजारांहून अिधक अतिरेकी या संघटनेच्या भात्यात आहेत. गुरुवारी अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आयएसचा नायनाट करण्याचा दृढनशि्चय बोलून दाखवल्यानंतर आयएसकडे लक्ष केंदि्रत करून दुसऱ्याच दिवशी सीआयएने हे आकडे जाहीर केले.

१३ वर्षांनंतर नवा शत्रू
११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर हल्ला करणारा लादेन संपवल्यानंतर १३ वर्षांनी अमेरिकेच्या नव्या शत्रूचा उदय झाला. इराक व सिरियामध्ये िब्रटनएवढ्या आकाराचे क्षेत्र व्यापून इस्लािमक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (आयएसआयएल) ऊर्फ आयएसआयएसने (इसिस/ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया) अमेरिकचीही डोकेदुखी वाढवली आहे.

लादेन गेला, बगदादी आला!
* अबू बकर अल-बगदादी हा या आयएसचा म्होरक्या आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये अल कायदा संघटनेपासून विभक्त होऊन त्याने ही संघटना बांधली.
* २९ जून २०१४ रोजी इस्लामिक स्टेट जाहीर करून अबू बकर अल बगदादीने स्वत:ला खलिफा म्हणून जाहीर केले.

सिरियापासून अलेप्पोपर्यंत दावा
इराकच्या अल अनबर, निनेवेह, िकर्कुक, सलाह अददिनचा बहुतांश भाग, बबील, दियाला व बगदादच्या काही भागावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. इसिसने इस्लािमक स्टेट जाहीर केले असून त्यांची बाकुबाह शहर कथित राजधानी आहे. आपल्या इस्लामिक स्टेटचा विस्तार सिरियातील अलेप्पोपर्यंत असल्याचा त्यांचा दावा आहे.