आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State News In Marathi, America, Divya Marathi

अमेरिका इस्लामिक स्टेटचा काट्याने काटा काढणार, बंडखोरांना प्रशिक्षण देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - इराक व सिरियाच्या सरहद्दीवर आपल्या दहशतीने मध्यपूर्व आणि अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरलेल्या इस्लामिक स्टेट फॉर सिरिया अँड लेव्हंटच्या (आयएसआयएल) अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी अमेरिकेने काट्याने काटा काढण्याचे धोरण अंगीकारले आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने सिरियातील बंडखोरांना शस्त्रास्त्र व प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी हा प्रस्ताव महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगत यातून आयएसआयएलचा समूळ नायनाट होईल, अशी आशा व्यक्त केली.
प्रतिनिधीसभागृहाने २७३ विरुद्ध १५६ मतांनी प्रस्ताव मंजूर केला. बंडखोरांना प्रशिक्षण दिल्यानंतर आयएसआयएल अितरेक्यांना सिरियाच्या हद्दीतून माघारी परतावून लावण्यात मदत मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रस्तावाला मंजुरी मिळणे आयएसआयएलविरोधातील महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते.