तेहरान - इस्लामिक स्टेटविरुद्ध कारवाई करण्यासाठी मदतीचा अमेरिकेने दिलेला प्रस्ताव इराणने धुडकावला आहे. धार्मिक नेते आयातुल्लाह खोमेनी यांनी सोमवारी ही भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवद जरीफ यांना सहकार्य मागितले होते. मात्र, जरीफ यांनी स्पष्ट नकार दिला होता.
पाकिस्तानप्रमाणेच
इराक आणि सिरियात िबनधास्त हल्ले करण्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी अमेरिकेवर केला. दरम्यान, अमेरिकेनेही
आपल्यासोबत १० अरब देश असल्याने आता इराणची गरज नसल्याचे म्हटले आहे.
इस्लामिक स्टेटविरुद्ध कारवाई करण्यासाठी झालेल्या चर्चेदरम्यान अमेिरकेने इराण आणि सिरियाला विश्वासात घेतले नव्हते. शिवाय सिरियामध्ये तीन वर्षे चाललेल्या गृहयुद्धादरम्यान इराणने राष्ट्रपती बशर अल-असद यांना मदत केली होती. तर अमेरिकेने बंडखोरांना साथ दिली होती.