आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State News In Marathi, Devid Hens, Divya Marathi

आयएसने केला ब्रिटिश नागरिकाचा शिरच्छेद, अमेरिकेला साथ दिल्याबद्दल ब्रिटन लक्ष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी सिरियामध्ये अपहरण करून ओलीस ठेवलेला ब्रिटिश मदत पथकातील सदस्य डेव्हिड हेन्स याचा शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री उशिरा जाहीर केला. यात हेन्सच्या सोबत दिसणारा दहशतवादी अमेरिकेला मदत केल्याबद्दल ब्रिटनला दूषणे देत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हा दहशतवादी ब्रिटशि ढबीतच अस्खलित इंग्रजी बोलताना दिसतो.

यापूर्वी आयएसने दोन अमेरिकी पत्रकारांचा शिरच्छेद केला होता. ब्रिटशि पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी या हत्येला दुजोरा दिला. अमेरिकेला साथ दिली तर यानंतरच्या काळात आपल्या ताब्यात असलेल्या आणखी एका ब्रििटश नागरिकाची याच पद्धतीने हत्या करण्यात येईल, अशी धमकी आयएसने ब्रिटनला दिली आहे.

ओबामांकडून निषेध : अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी हेन्ज याच्या हत्येचा तीव्र निषेध केला. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी ब्रिटन आणि इतर देशांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी सर्व राष्ट्रांना केले.
डेव्हीड हेन्स (४४) मूळ पर्थचा रहिवासी आहे. त्याला दोन मुले आहेत. सिरियामध्ये ब्रिटिश मदत पथकात तो कार्यरत होता. गेल्या वर्षी त्याचे अपहरण करण्यात आले.

इसिस : सारे क्रौर्य इस्लामी राष्ट्र स्थापण्यासाठी
'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' (इसिस) नावाने उदय पावलेल्या या कट्टरवादी संघटनेचे संपूर्ण इस्लामी राष्ट्र स्थापन करण्याचे ध्येय आहे. यासाठी वाटेल ते क्रौर्य करण्याची या संघटनेतील अतिरेक्यांची तयारी आहे.

न्याय मिळवून देऊ
पंतप्रधान कॅमरून यांनी या हत्येचा तीव्र निषेध करताना हेन्स याची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ. यासाठी कितीही कालावधी लागला तरी आपली सर्व ऊर्जा खर्च करून हा लढा लढला जाईल, असेही जाहीर केले.

आयएसची स्थापना
सुन्नी कट्टरवादी गटाने मध्यपूर्वेत या कट्टरवादी संघटनेची स्थापना केली. इराक व सिरियाच्या सरहद्दीवर त्यांनी स्वयंघोषित खलिफा सरकारही जाहीर केले आहे. जगभरात बहुतांश भागांत अर्थात इराक, सिरियापासून लेव्हंट प्रदेशापासून (जॉर्डन, इस्रायल, पॅलेस्टाइन, लेबनॉन, सायप्रस आणि दक्षणि तुर्कस्तानचा काही भाग) इस्लामी राजवट स्थापन करण्याचे या संघटनेचे ध्येय आहे. त्यासाठी संघटनेने जिहाद पुकारला असून जगभरात ती जाळे पसरवत आहे.

कुटुंबीयांची विनंती धुडकावली
कुटुंबीयांनी गेल्या वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या हेन्स याच्याशी संपर्क साधण्यासाठी दहशतवाद्यांना जाहीर विनंती केली होती. यानंतर काही वेळातच हा व्हििडओ दहशतवाद्यांनी जाहीर केला.

श्रीमंती आणि मनसुबे
* मोसूल सेंट्रल बँक लुटीतून २५ कोटी डॉलर्सची रक्कम मिळवून जगातील सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना
*सद्दाम हुसेन यांचा रासायनिक शस्त्रसाठा आयएसकडे
*रासायनिक, जैविक हल्ल्याचे मनसुबे. तुर्कीच्या सीमेजवळील सिरियन गावात लॅपटॉप आढळला होता. त्यात अरबीमध्ये नरसंहार करणाऱ्या अस्त्राची शास्त्रीय माहिती होती. १९ पानांचा तो दस्तऐवज होता.
* प्लेग िकंवा इतर संसर्गजन्य आजारांचा फैलाव करण्याचे मनसुबे.