आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Islamic State News In Marathi, Divya Marathi, British, Terrorist

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयएसचा नवा व्हिडिओ; पुन्हा ब्रिटिश निशाण्यावर, तिसरे आखाती युद्ध लादण्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी मंगळवारी ओलीस ठेवलेल्या आणखी एका ब्रिटिश पत्रकाराचा व्हिडिओ जारी केला आहे. जॉन केंटली असे या पत्रकाराचे नाव असून व्हिडिओमध्ये अमेरिकाप्रणीत फौजांनी चालवलेल्या हवाई हल्ल्याविरुद्ध इशारा देण्यात आला आहे. पाच मिनिटांच्या या चित्रफितीत केंटली अमेरिकेला इशारा देत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांनी तिसरे आखाती युद्ध सुरू केले आहे. केवळ व्हिएतनाम युद्ध नव्हे, आम्ही त्यानंतरही अशी ओढवलेली परिस्थिती पाहिली आहे, असे केंटली म्हणाले.
इस्लामिक स्टेटविरुद्ध लढण्यासाठी १५ हजार जवानांची आवश्यकता व्यक्ती केली जाते, ती हास्यास्पद आहे. आयएसकडे त्यापेक्षा कितीतरी संख्येत मुजाहिदीन आघाडीवर आहेत, असे जॉनने म्हटले आहे. अमेरिकी फौजा सिरियातील आयएसच्या ठिकाणांवर हल्ले चढवत असताना हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पहिल्या व्हिडिओचीच पार्श्वभूमी
ठरावीक बंदूकधा-यांच्या सहभागातून तयार झालेली ही बेशिस्त संघटना नाही. भगव्या कपड्यामध्ये दाखवण्यात आलेल्या ४३ वर्षीय जॉनने स्वत:ची ओळख माझ्या सरकारने दुर्लक्षित केलेला ब्रिटिश नागरिक आणि इस्लामिक स्टेटमध्ये दीर्घकाळापासून कैदेत असलेला व्यक्ती अशी दिली आहे. लेंड मी युअर इयर्स आणि मेसेजस फ्रॉम ब्रिटिश डिटेनी जॉन केंटली असे या व्हिडिओचे शीर्षक होते.

अमेरिकेची हवाई कारवाई सुरूच
अमेरिका व मित्र राष्ट्रांच्या फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यानंतर उदध्वस्त झालेले आयएसचे तळ


दोन अमेरिकी, एका ब्रिटिशाचा शिरच्छेद
अलीकडच्या इतिहासात आयएस ही सर्वात सशक्त जिहादी चळवळ आहे. त्यामुळे अमेरिकाप्रणीत गट त्यांना इजा पोहोचू शकत नाही. इराक आणि सिरियाच्या एक तृतीयांश भागावर वर्चस्व प्रस्थापित करणा-या आयएसने याआधी अमेरिकी पत्रकार जेम्स फोले आणि स्टीव्हन सॉटलॉफ व ब्रिटिश नागरिक डेव्हिड हैनस यांचा शिरच्छेद केला होता. त्यांनी अन्य एक ओलीस ब्रिटिश अ‍ॅलन हेनिंग्जची हत्या करण्याचा इशारा दिला आहे.

जॉनचे दोनदा झाले होते अपहरण
सिरियामध्ये अपहरण झाल्यानंतर जॉनने जुलै २०१२ मध्ये स्वत:ची सुटका करून घेतली होती. २०१२ च्या अखेरीस ते ब्रिटनमध्ये परतले होते. यानंतर पुन्हा त्यांचे अपहरण झाले. या काळात केंटलीचा ठावठिकाणा माहीत नव्हता; परंतु ज्या ठिकाणी अमेरिकी व ब्रिटिश व्यक्तीची हत्या करण्यात आली, तिथेच त्यांना ठेवण्यात आले असावे, अशी शक्यता आहे.

सिरियात आयएसच्या तळांवर अमेरिकी हल्ले
अमेरिका व त्याच्या मित्र देशांनी सिरियातील इस्लामिक स्टेटच्या तळांवर हवाई हल्ले सुरू केल्याची माहिती अमेरिकी संरक्षण मंत्रालय मुख्यालय पेंटागॉनने दिली आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते रियर अ‍ॅडमिरल जॉन किर्बी म्हणाले, हवाई हल्ल्यात टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर सुरू केला जात आहे. हल्ले अशा स्थितीत सुरू केले आहेत, ज्याची अधिक माहिती दिली जाऊ शकत नाही. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आयएसचा नायनाट करण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर हे हल्ले सुरू करण्यात आले आहेत. आयएसच्या भीतीमुळे गेल्या काही दिवसांत सिरियातील लाखो कुर्द नागरिकांनी तुर्कस्तानमध्ये पलायन केले आहे.
( छायाचित्र - ब्रिटिश पत्रकार जॉन केंटली)