आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Islamic State News In Marathi, Divya Marathi, Turkey

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुर्कस्तानात कुर्द संतप्त,सिरियाच्या १.५ लाख निर्वासितांसोबत दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम उघडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस/अंकारा - तुर्कस्तानमधील कुर्द जमात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवर तीव्र संतापली आहे. सोमवारी हजारो नागरिकांनी तुर्क-सिरिया सीमेवरून सिरियाला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तुर्की सैनिकांनी त्यांना रोखले.

इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी हल्ल्यांना घाबरून जवळपास दीड लाख कुर्द नागरिक तुर्कस्तानात आले. त्यांना माघारी जाण्यासाठी शनिवारी तुर्कींनी नऊ चेक पोस्ट खुले केले. प्रचंड दहशतीखालील शरणार्थींचे हाल पाहून तुर्कस्तानमधील कुर्द नागरिकांचा संताप झाला. सीमा पार करून सिरियात प्रवेश करण्यासाठी हजारो कुर्द एकवटले. मात्र सैनिकांनी त्यांना रोखले. हे नागरिक सैन्याला भिडले. नागरिकांचा संताप अनावर झालेला पाहून लष्कराने ९ पैकी सात चेकपोस्ट बंद केले. इस्लामिक स्टेटचे दहशतवादी सिरिया-तुर्क सीमेवरून १०-१५ किलोमीटर अंतरावरील कोबानीपर्यंत पोहोचले आहेत. सिरियन कुर्द सैनिक त्यांना पुढे जाण्यापासून रोखत आहेत. तुर्कीमध्ये बंदी घालण्यात आलेली कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (पीकेके) अनेक दशकांपासून स्वायत्ततेसाठी तुर्की सरकारशी संघर्ष करत आहे. आता त्यांनी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडण्याची घोषणा केली आहे.

हवाई हल्ल्यात ४२ ठार
सिरियातील इदलीब प्रांतात बंडखोरांच्या ताब्यातील परिसरात सरकारी लष्कराच्या हवाई हल्ल्यात ४२ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. लष्कराने रविवारी सराकेब आणि एहसीम येथे हवाई हल्ले केले होते. लंडनमधून चालवली जाणारी सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने केलेल्या दाव्यानुसार या हल्ल्यात दबले गेले आहेत.

आयएस चीनपर्यंत
इस्लामिक स्टेटचे दहशतवादी चीनच्या बंडखोरांना प्रशिक्षण देत आहेत. चिनी माध्यमांनी सोमवारी प्रथमच ही माहिती दिली. त्यानुसार शिजियांग प्रांतातील शेकडो तरुण प्रशिक्षण घेण्यासाठी चीनमधून पलायन करत आहेत. चीन सरकार शिजियांगमधील दहशतवादी हल्ल्यांसाठी मुस्लिम उइघर बंडखोरांना जबाबदार मानते.
(छायाचित्र: तुर्कस्तानमधील कुर्द जमात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवर तीव्र संतापली) आहे.