आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Islamic State News In Marathi, Iraq, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्लामीस्टेटच्या क्रूरकर्म्यांनी इराकमध्ये ८०० सैनिकांची केली हत्या; २० ओलीस बचावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवानिया - इस्लामीस्टेटच्या (आयएस) निर्घृणतेचे अनेक प्रकार हळूहळू समोर येत आहेत. या क्रूरकर्म्यांनी ८०० इराकी सैनिकांची सामूहिक हत्या केल्याचे नुकतेच स्पष्ट झाले. दहशतवाद्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून आलेल्या वीस जवानांनी आपबीती कथन केली तेव्हा अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेले जवान मारले गेल्याचे उघडकीस आले.

दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या ८०० इराकी जवानांच्या एका रांगेत १० याप्रमाणे रांगा तयार केल्या आणि नंतर अंदाधुंद गोळीबार करत या जवानांची हत्या केली. या गोळीबारातून वीस सैनिक कसेबसे जीव वाचवून पळून आले. मोहंमद मजुल हामोद (२४) या जवानाने घरी परतल्यानंतर पत्रकारांना हकिगत कथन केली. "मी स्वत:ला सुन्नी असल्याचे सांगितल्यामुळे बचावलो. अतिरेक्यांनी ११ दिवस मला कैदेत ठेवले. याच काळात त्यांनी उर्वरित जवानांची हत्या केली,' असे हामोद याने सांगितले.

काही दिवसांपूर्वी इराकमध्ये १५०० जवानांच्या एका तुकडीला प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना तिक्रित शहराजवळ एका शिबिरात ठेवण्यात आले होते. या शिबरातूनच ८०० हून अधिक सैनिकांचे अतिरेक्यांनी अपहरण केले होते.

कमांडरनीच विकले
हामोद याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या शििबरात या सैनिकांना ठेवण्यात आले होते त्या शिबराच्या कमांडरनेच धोका दिला. भरतीच्या वेळीच या कमांडरने अतिरेक्यांपासून बचाव होईल, अशी योजना असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात तिक्रितमध्ये अतिरेकी घुसले तेव्हा त्याने जवानांना वाऱ्यावर सोडले. अतिरेक्यांशी लढण्यासाठी तेव्हा या जवानांकडे एकही बंदूक नव्हती. सबंध शिबिरात एकही शस्त्र नव्हते, असे हामोद म्हणाला.