आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Islamic State News In Marathi, Terrorist Group, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्लामिक स्‍टेट या दहशतवादी संघटनेने केली तुर्कीतील ४९ ओलिसांची सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने शनिवारी ओलीस असलेल्या ४९ तुर्कीच्या नागरिकांची सुटका केली आहे. आयएसकडे ओलीस असलेल्या ४९ तुर्की नागरिकांची सुटका करण्यात आली, असे तुर्कीचे पंतप्रधान अहमेत दावुतोग्लू यांनी जाहीर केले.ओलिसांमध्ये काही राजनैतिक अधिकारी, त्यांचे कुटुंबीय, काही सैनिकही आहेत.
शनिवारी सकाळी हे सर्वजण दक्षिण तुर्कीमधील सॅनलीर्फा शहरात सुखरूप दाखल झाले.आयएसच्या दहशतवाद्यांनी जूनमध्ये मोसूल शहरावर ताबा मिळविल्यानंतर तुर्कीच्या दूतावासात काम करणा-या या सर्वांना ओलीस ठेवण्यात आले होते. आयएसविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या कारवाईमध्ये तुर्कीचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या ओलिसांना सोडण्यात आले आहे. आयएसच्या दहशतवाद्यांनी इराक व सिरियामधील अनेक प्रदेश ताब्यात घेतले आहेत.