आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State News In Marathi, Terrorist Group, Divya Marathi

इस्लामिक स्टेट या दहशवादी संघटनेच्या रडारवर आता युरोपीय संघटनेचे मुख्यालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रुसेल्स - सिरिया, इराकनंतर व अमेरिकी नागरिकांना लक्ष्य केल्यानंतर इस्लामिक स्टेट या दहशवादी संघटनेच्या रडारवर युरोपीय संघटनेचे मुख्यालय आहे, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेच शनिवारी अनेक संशयितांच्या विरोधात अटकसत्र राबवण्यात आले.
शनिवारी डच टीव्ही एनओएसकडून हा दावा करण्यात आला होता. परंतु अशा प्रकारचा धोका असल्याच्या वृत्ताला युरोपीय संघटनेकडून मात्र दुजोरा मिळाला नाही.त्यामुळेच मुख्यालयाच्या इमारतीची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे रविवारी दिसून आले नाही.

अशा प्रकारच्या धमकीचा संदेश आपल्याला मिळाला नसल्याचे कमिशनच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. याअगोदर मे महिन्यात मध्य ब्रुसेल्स येथील ज्यू संग्रहालयावर झालेल्या हल्ल्याप्रमाणेच हा हल्ला करण्याची योजना असल्याचा दावा मीडियातून करण्यात आला आहे. संग्रहालयावरील हल्ल्यात ४ जण ठार झाले होते.

दरम्यान, आयएसने ओलिस ठेवलेल्या ब्रिटीश टॅक्सी चालकाची सुटका करण्यात यावी, अशी विनंती त्याच्या पत्नीने केली आहे. अ‍ॅलन हेनिंगचे गेल्या डिसेंबरमध्ये अपहरण झाले होते. तेव्हापासून ते आयएसच्या ताब्यात आहेत. अ‍ॅलनने नेहमीच आपल्या मुस्लिम मित्र व सहका-यांना मदत केली आहे. त्यांचा स्वभाव शांत आहे. गरजूंना त्यांनी नेहमीच मदत केली. म्हणूनच त्यांची सुटका करावी, असे अ‍ॅलनची पत्नी बार्बरा हेनिंगने म्हटले आहे.

२८ देश सदस्य
युरोपीय संघटनेत २८ देश सदस्य आहेत. अत्यंत हायप्रोफाइल मानल्या जाणा-या भागात संघटनेची ही इमारत आहे. त्यात हजारो अधिकारी-कर्मचारी आहेत. त्याला लक्ष्य करून हिंसाचार घडवण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे आहेत. आयएसच्या विरोधातील युद्धात बेल्जियमदेखील उतरले असल्याने आयएसने त्यांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे.