आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State News In Marathi, Video, British Journalist, Divya Marathi

इस्लामिक स्टेटचा आणखी एक व्हिडिओ, ब्रिटिश पत्रकार ओलिस असल्याचे दाखवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने शुक्रवारी आणखी एक व्हिडिओ जारी केला. त्यात ब्रिटिश पत्रकाराला ओलिस ठेवण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. या अगोदर संघटनेने अमेरिकेचे दोन पत्रकार व एका ब्रिटिश नागरिकाचा शिरच्छेद केला होता.

ओलिस असलेल्या व्यक्ती स्वत:ची ओळख जॉन कँटली अशी सांगतो. कॅमे-यासमोर बोलताना कँटली दाखवण्यात आला आहे. हत्या झालेल्या पत्रकारांप्रमाणेच कँटली यांच्या अंगावरही केशरी रंगाचे कपडे आहेत. त्यांचे २०१२ मध्ये सिरियातून अपहरण करण्यात आले. सध्या आयएसच्या सिरियाचा एक तृतीयांश प्रदेश ताब्यात गेला आहे. ‘लेंड मी युवर इअर्स’ असे व्हिडिओचे शीर्षक आहे. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये ब्रिटनचा सहभाग होता. दोन्ही युद्धे अप्रिय होती. मग आपले सरकार या संघर्षात का पडत आहे, असा सवाल कँटली यांनी केला आहे. दहशतवाद्यांच्या ताब्यात असल्यामुळेच सरकारला दूषणे देत असल्याचे तुम्हाला वाटेल, परंतु काही गोष्टींची पडताळणी करून सरकारने निर्णय घेतला पाहिजे, एवढे तळमळीने सांगावेसे वाटते. माझ्याकडे आता गमावण्यासारखे काहीही राहिलेले नाही.