आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Terrorists Took Loan From Banks For Terror Activities

इस्लामिक स्टेटची दहशतवादी कारवायांसाठी पैशांची जमवाजमव, बँकांकडून घेतले कर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - आयएस अर्थात इस्लामिक स्टेटची दहशतवादी कारवायांसाठी पैशांची जमवाजमव करण्याची वेगळी पद्धत उजेडात आली आहे. आयएसने बँकांकडून कर्ज घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जाचा पैसा देशोदेशीचे दौरे-मौजमजा तसेच दहशतवादी कारवायांसाठी निधी म्हणून वापरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने तपास यंत्रणेसह सरकार हादरले आहे.
मलेशियात आयएसच्या पाच समर्थकांना अटक करण्यात आली. त्यानंतर ही बाब पुढे आली आहे. या पाचही जणांनी आयएसच्या कारवायांसाठी घरदार विकले. नोकरी सोडून दिली आणि बँकेकडून कर्जदेखील घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. यातील काहींनी सुमारे २० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, असे ‘न्यू स्ट्रेट्स टाइम्स’ ने अधिका-यांच्या हवाल्याने म्हटले आहे.
मलेशियातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलेल्या ३० वर्षीय व्यक्तीने कर्ज घेतल्याचे कबूल केले. तो दहशतवादी संघटनेच्या आदेशावरून देशोदेशी फिरत होता. त्याचा थांबा ब्रुनेई आणि भारत असा होता. त्यामुळे यापुढे बँकांनी कर्ज देताना खात्री करूनच ते द्यावेत, अशी सूचना मलेशियाच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या विशेष शाखेने केली आहे.

सिरियातील कारवाईसाठी पैसा
दहशतवाद्यांनी मलेशियन बँकांमध्ये पर्सनल लोनच्या नावाखाली हा पैसा मिळवला. त्यानंतर तो मलेशियातून सिरियातील दहशतवादी कारवायात वापरण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. पकडण्यात आलेल्या संशयितांकडूनही अशीच माहिती मिळाली. मलेशियात अलीकडे पर्सनल लोन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर आता पोलिसांनी निगराणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जुनीच पद्धत
सिरियात आयएसने आपल्या कारवायांत पैसा कमी पडू नये म्हणून संघटनेच्या पाठीराख्यांना कर्ज घेण्यास सांगितले होते. हा ट्रेंड जुनाच आहे. त्यामुळे परदेशी गेलेल्या संघटनेच्या पाठीराख्यांची मलेशियात आल्यानंतर तत्काळ चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हवाई कारवाईसाठी मदत, जाहीर शिरच्छेदाचा व्हिडिओ
सिरियातील आयएसच्या हवाई कारवाईच्या विरोधात जाऊन लष्कराला मदत केल्याचा ठपका ठेवून एका नागरिकाचा शिरच्छेद करण्यात आला. आयएसने हे कृत्य केले असून शनिवारी त्याचा व्हिडिओ जारी करण्यात आला. सिरियाच्या उत्तरेकडील अलेप्पोमध्ये दहशतवाद्यांनी नागरिकाला क्रूर पद्धतीने ठार केले. आयएसच्या कारवाईत ४० दिवसांत ५०० नागरिक ठार झाले. संघटनेने २ हजार हवाई हल्ले केले आहेत.