आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Terrorists Trained In Pakistan, Iraq

आयएसच्या अतिरेक्यांना पाक, इराकी अधिका-यांकडून प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना पाकिस्तान, इराक आणि पूर्वीच्या सोव्हिएत संघातील लष्करी अधिकारी युद्धाचे प्रशिक्षण देत असल्याचा दावा कुर्द नेता बरजानी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक स्तरावर प्रचंड खळबळ माजली असून यामुळे पूर्वीच्या सोव्हिएत संघाचा घटक असलेल्या युक्रेनवरून रशिया व पाश्चात्त्य देशांत निर्माण झालेला तणाव यामुळे वाढू शकतो.

इराकी कुर्दिस्तानचे राष्ट्रपती मसूद बरजानी यांच्यानुसार, आयएसच्या दहशतवाद्यांनी १७०० अमेरिकन बुलेटप्रूफ गाड्यांवर ताबा मिळवला आहे. पूर्वीच्या सोव्हिएत संघात लष्करी अधिकारी म्हणून राहिलेल्या तज्ज्ञ लोकांची भरती आयएसने केली असून उज्बेकिस्तान, कझाकिस्तान, तातारिस्तान व चेचन्यातून या लोकांना आयएसमध्ये सक्रिय व्हावे म्हणून आणण्यात आली आहे. पाकचे कोणते अधिकारी या प्रशिक्षणात मदत करत आहेत, याचा तपशील मात्र बरजान यांनी दिलेला नाही. आयएसने सिरिया व इराकमधील ब-याच भूप्रदेशांवर ताबा मिळवून ‘खलिफाचे राज्य’ घोषित केले आहे. इराक व सिरियात शस्त्रास्त्रांची लूट करून त्यांनी शस्त्रसाठा केला आहे.

पुढे वाचा ड्रोन हल्ल्यात म्होरक्या मुल्ला रऊफचा मृत्यू...