आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Will Use Social Media For Attacking

इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी हल्ल्यासाठी घेणार सोशल मीडियाचे साहाय्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रुसेल्स - इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्याचे नवे तंत्र सुरू केले आहे. यासाठी सोशल मीडियाचे साहाय्य घेण्यात येत आहे. आत्मघातकी हल्ला करणारा दहशतवादी स्वत:ला शहीद जाहीर करतो किंवा त्याच्या सहकार्याला तसे जाहीर करण्यास सांगतो. त्यानंतर दुस-या नावाने ते स्वदेशी परततात. तेथे ते आत्मघातकी हल्ला करतात.

बेल्जियममध्ये पोलिस चकमकीत एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला त्या वेळी हे प्रकरण उघडकीला आले. इस्लामिक स्टेटच्या सदस्यांनी काही आठवड्यांपूर्वी तारिक जदाऊ सिरियात शहीद झाल्याचे जाहीर केले. त्याच्या छायाचित्रासह ते हेतुपुरस्सर सोशल मीडियावर जाहीर करण्यात आले. तारिक त्यानंतर बेल्जियममध्ये दाखल झाला. गेल्या गुरुवारी जर्मन सीमेजवळ झालेल्या चकमकीत तो व त्याचा सहकारी रदुआन हगाउईही मारला गेला. हे दोघेही एका पोलिस अधिका-याचे शिरकाण करण्याच्या उद्देशाने आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. ब्रिटनमधील एका युवकाच्या बाबतीत असेच प्रकरण समोर आले आहे. तो सिरियात मारला गेल्याचे जाहीर केले होते. मात्र, तो ब्रिटनमध्ये पकडला गेला.

पुढे वाचा...