आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोको हरामने केले ४० जणांचे अपहरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलारी - ईशान्य नायजेरियात संशयित बंडखोर इस्लामी संघटना बोको हरामने ४० मुले आणि तरुणांचे अपहरण केल्याचे उजेडात आले आहे.

बोर्नो प्रांतातील मलारी गावातून जीव मुठीत घेऊन पळून आलेल्या काही गावकऱ्यांनी अपहरणाची माहिती दिली. गेल्या वर्षीदेखील बोको हराम गटाने २०० शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण केले होते. शस्त्रास्त्रांनी भरलेल्या गाड्या घेऊन बंडखोर गट गावात आले आणि त्यांनी उपदेश ऐकण्याचे आदेश दिले. तरुणांना एकत्र करून जवळच्या जंगलात नेण्यात आले. माझी दोन मुले आणि तीन भाच्यांना बोको हराम गटाने उचलून नेल्याची माहिती मलारी गावकऱ्याने दिली.