आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamist Group Condemns Egypt\'s Muslim Brotherhood Death Sentences

686 दोषींच्या सामुहीक फाशीला विरोध करणार्‍या देशांना इजिप्तचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काहिरा- मुस्लिम ब्रदरहुडच्या प्रमुखासह 683 आरोपींना ठोठावण्यात आलेल्या सामुहीक फाशीच्या शिक्षेला विरोध आंतरराष्‍ट्रीय पातळीवर विरोध होत आहे. मात्र, सामुहीक फाशीच्या शिक्षाेला विरोद करणार्‍या देशांना इजिप्त सरकारने इशारा दिला आहे. कोर्टाच्या निर्णयाला कोणतीही संघटनेचा अथवा देशाचा विरोध खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इराशा इजिप्तचे कायदा मंत्री नायेर ओस्मान यांनी दिला आहे.

ओस्मान म्हणाले, कोर्टाच्या निर्णयावर हरकत घेण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. न्यायाधिश ही देखील एक व्यक्ती आहे. त्यांच्याकडूनही अनावधानाने चूका होऊ शकतात. सामुहीक फाशीचा निर्णय हा अंतिम निर्णय नाही. एक कनिष्ठ कोर्टाने हा निर्णय दिला आहे. कोर्टाने हा निर्णय दिला तेव्हा 608 आरोपी गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या उपस्थित पुन्हा हा निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 'मुस्लिम ब्रदरहुड'ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. इजिप्तमधील एका कोर्टाने गेल्या आठवड्यात मुस्लिम ब्रदरहुडचा प्रमुख मुहम्मद बैदी याच्यासह 683 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर अनेक देशांनी इजिप्तमधील कोर्टाच्या या निर्णयावर टीका केली आहे.

जर्मनीने या विरोधात इजिप्तमध्ये राजदूताची नेमणूक केली आहे. अमेरिकेने याला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मूलभूत सिद्धांतांचे उल्लंघन असल्याचे सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, फाशीची शिक्षा ऐकताच बेशुद्ध पडल्या महिला...