आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamist Militants Overreached In Iraq And Syria?

हजारो विदेशी योद्ध्यांनी इराक, सिरियामध्ये सांभाळलाय मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
18 जूनला अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये जॉर्ज बुश इंटरकाँटिनेंटल एअरपोर्टवर पोलिसांनी मायकेल टॉड वोल्फे, त्यांची पत्नी जोर्डन निकोल फर व दोन मुलांना अटक केली. ‘एफबीआय’द्वारे न्यायालयात दाखल दाव्यानुसार वोल्फे टोरंटो, कॅनडामार्गे सिरियात जाणार होता. तो मुस्लिम दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड ग्रेटर सिरिया (आयएसआयएस)मध्ये सामील होणार होता. वोल्फे तर सिरियात नाही जाऊ शकला, मात्र एका अमेरिकी अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार जवळपास डझनभर अमेरिकी नागरिक युद्धात सहभागी होण्यासाठी सिरियामध्ये गेले आहेत.

सिक्युरटी फर्म फ्लैशपॉइंट ग्लोबल पार्टनर्सचे विश्लेषक ललित अलखौरी यांचे म्हणणे आहे की, अनेक अमेरिकी आयएसआयएसमध्ये सामील झालेले आाहेत. यातील एक एरिक हारून याला मार्च 2013 मध्ये अमेरिकेत परतल्यावर अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अमेरिकेच्या बाहेर विनाशकारी हत्यारांचा वापर करण्याचा आरोप आहे. गुप्तचर अधिकारी चिंतित आहेत की, कट्टर दहशतवाद्यांकडून प्रशिक्षण घेऊन असे लोक देशात येथील आणि येथे घातपात घडवतील.

या वेळी आयएसआयएसचे लक्ष इराक आणि सीरियामध्ये जास्तीत जास्त भागावर कब्जा मिळविण्यावर आहे. पण, त्यांचे लक्ष्य पाश्चिमात्य देशदेखील राहणार आहेत. त्या प्रकारचे हल्ले सुरू झालेले आहेत. संरक्षण विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार जवळपास तीन हजार युरोपीयन, अमेरिकी व ऑस्ट्रेलियन्सच्या सीरिया, इराकमध्ये लढण्यामुळे पाश्चात्यांसमोर संकट उभे आाहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या तीन वर्षांत 12 हजार विदेशी योद्धे सीरियामध्ये

पोहोचलेले आहेत. सीरिया, इराकमध्ये आयएसआयएसला मिळालेले यश अशा मुस्लिमांना आकर्षित करीत आहे, जे पाश्चात्यांच्या जीवनशैलीला कंटाळलेले आहेत. अलखौरी म्हणतात की, आयएसआयएसला आणखी योद्धे मिळतील. अनेक योद्ध्यांचा स्वदेशी परतण्याचा इरादा नाही. त्यांना जे पाहिजे ते बगदादीच्या इस्लामी राज्यात मिळाले आहे.