आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel Agreed For Permanent Truce Says An Officer On Condition Of Anonymity, Divya Marathi

गाझापट्टीवर कायमची शस्त्रसंधी, इस्रायल सहमत असल्याचा पॅलेस्टाईनचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राफा शहरात इस्रायल हल्ल्यात उद्ध्‍वस्त इमारतीजवळ रडताना पॅलेस्टिनी मुलगा.) - Divya Marathi
(राफा शहरात इस्रायल हल्ल्यात उद्ध्‍वस्त इमारतीजवळ रडताना पॅलेस्टिनी मुलगा.)
गाझा सिटी - गाझापट्टीवर कायमस्वरुपाची शस्त्रसंधी लागू करण्‍यासाठी सहमती बनली आहे, असे एका वरिष्‍ठ पॅलेस्टीनी अधिका-यांने दावा केला आहे. इस्रायलबरोबर दीर्घकालीन शस्त्रसंधीबाबत चर्चा झाली आहे, असे अधिका-यांने वृत्तसंस्था एएफपीला सांगितले आहे. गोप‍नीयतेच्या अटीवर अधिका-याने एएफपी सांगितले की, इजिप्तच्या मध्‍यस्थीने इस्रायल, हमास आणि पॅलेस्टीनी प्रतिनिधी यांच्या दरम्यान दीर्घकालीन शस्त्रसंधीवर सहमती मिळाली आहे.

पॅलेस्ट‍िनी प्रतिनिधीमंडळाचे नेते अझाम अल अहमदने अल- जझीराला सांगितले की, पॅलेस्टीनी राष्‍ट्रपती मेहमूद अब्बास पुढील काही तासांमध्‍ये शस्त्रसंधीसाठी झालेल्या कराराची सर्व माहिती प्रसिध्‍द करणार आहे. दोहा, कैरो, गाझा आणि रामल्ला येथे झालेल्या दीर्घ वार्तानंतर युध्‍दविरामावर सहमती बनली आहे.

सात महिने चालू असलेल्या संघर्षाची समाप्ती लवकरच होईल याची घोषणा केली जाईल, असे हमासचे वार्ताकार मूसा अबू मर्झुक यांनी सांगितले. 8 जुलैपासून सुरू झालेल्या हल्ल्यात इस्रायलने हमासवर 5 हजारपेक्षा जास्त क्षेपणास्त्रांचा मारा करण्‍यात आला आहे, तर हमासच्या दहशतवाद्यांनी 4 हजार क्षेपणास्त्र टाकली आह. हल्ल्यात 2 हजार 200 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात 500 चिमुकल्यांचा समावेश आहे. इस्रायलचे 64 सैन‍िक आणि चार नागरिक मारली गेली आहेत.

पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा गाझापट्टीवरील सद्य:स्थिती.....