आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाझापट्टीत इस्रायलचे रॉकेट; आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा जेरुसलेम- गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा निघत नसतानाच इस्रायलने बुधवारी गाझापट्टीतील विमानतळावर रॉकेट लँड केले. त्यामुळे नुकत्याच घडलेल्या एमएच-17 या मलेशियन विमानाच्या घटनेची धास्ती घेऊन रॉकेट हल्ल्याच्या भीतीने अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी इस्रायलकडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली. अनिश्चित काळासाठी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सेवा रद्द करण्याचा निर्णय घेणारी डेल्टा ही पहिली विमान कंपनी आहे. इस्रायलमधून आणि इस्रायलकडे जाणार्‍या विमान फेर्‍या रद्द करण्यात आल्या. पहिल्या फ्लाइटमध्ये 273 प्रवासी होते. त्यानंतर अमेरिकेच्याच फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) कंपनीने इस्रायलमधील सेवा रद्द केली. एअर फ्रान्स, नेदरलँडची एअरलाइन केएलएम यांनीही विमानसेवा रद्द केल्याचे जाहीर केले. अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी सेवा बंद केल्यामुळे इस्रायलच्या पर्यटन उद्योगाला त्याचा फटका बसला आहे. गाझा पट्टीतील एका विमानतळावर इस्रायलने रॉकेट लँड केल्यानंतर विमान कंपन्यांनी धास्ती घेतली. दरम्यान, आतापर्यंतच्या हिंसाचारात 4 हजार 40 पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाले. संघर्षात 29 इस्रायली सैनिक आणि दोन नागरिक ठार झाले. सध्या 1 लाख 18 हजार 300 पॅलेस्टिनी नागरिकांना संरक्षण तळावर हलवण्यात आले. गाझापट्टीतील 43 टक्के भागावर युद्धाचा प्रभाव दिसून आला आहे.

संयुक्त राष्ट्राकडून इस्रायलला समज; रात्रीतून187 हल्ले
गाझा सिटीपासून काही अंतरावरील शाजा भागात इस्रायली लष्कराने 187 ठिकाणी जोरदार हल्ले केले. हा परिसर इस्रायली सरहद्दीला लागून आहे. हमासने आपले नियंत्रण केंद्र, बोगदे, शस्त्रे, रॉकेट नागरी भागातच दडवून ठेवले आहेत.

इस्रायलच्या तेल अवीव शहरातील बेन गुरिऑन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे रद्द झाल्यामुळे हवालदिल प्रवासी.

पुरावे दाखवले : जेरुसलेममध्ये संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. या भेटीत नेतन्याहू यांनी मून यांना हमासकडून झालेल्या हल्ल्याचे पुरावे दिले. देशाच्या भूप्रदेशावर पॅलेस्टाइनकडून डागण्यात आलेल्या रॉकेटचा संग्रह त्यांनी मून यांना दाखवला. त्यावर मून यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर इस्रायललादेखील त्यांनी समज दिली. अशा प्रकारे देशात शांतता नांदणार नसल्याचे त्यांनी म्हटले. वार्ड यांच्या वक्तव्याशी संबंध नसल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर वार्ड यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचेही संकेत देण्यात आले.

संघर्षविरामाचा फियास्को : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी मंगळवारी इजिप्त आणि अरब देशातील अधिकार्‍यांशी कैरोमध्ये चर्चा केली. त्यात संघर्षविराम प्रत्यक्षात येऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु या प्रयत्नाला यश मिळू शकले नाही. ओबामा यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेली मध्यस्थी निष्फळ ठरली.

ब्रिटिश खासदाराचा इस्रायलवर ट्विटर हल्ला
लंडन- एका ब्रिटिश खासदारांनी केलेल्या ट्विटवरून ब्रिटनमध्ये वादंग निर्माण झाले आहे. गाझामध्ये राहत असतो तर इस्रायलवर रॉकेट हल्ला केला असता का, हा एक मोठा सवाल आहे; परंतु मला वाटते त्याचे उत्तर होय, असेच द्यावे लागेल, असे या लोकप्रतिनिधीने ट्विट केले. डेव्हिड वार्ड असे त्यांचे नाव आहे. वार्ड हे लिबरल डेमोक्रॅट पक्षाचे खासदार आहेत. ट्विटनंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. इस्रायलचे समर्थन करणार्‍या अमेरिकेच्या गटात ब्रिटन आहे.