आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई हल्ल्यादरम्यान इस्रायलचे नागरिक घेताय फोटोग्राफीची मजा, फेसबुकवर होतेय टिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुक पेज 'बॉम्ब शेल्टर सेल्फीज'वर पोस्ट केलेले सेल्फी
येरुशलम- इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाला दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. यादरम्यान इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये 700पेक्षा जास्त पॅलेस्टाइननी प्राण गमावले आहेत. इस्रायलचे नागरिक मात्र हल्ल्यादरम्यान स्माइलिंग सेल्फी आणि फोटो पोस्ट करून आनंद साजरा करत आहेत. या कृत्याबद्दल त्यांची इंटनेटवर जोरदार टिका केली जात आहे.
तेल अवीवमध्ये निर्वासित घरांमध्ये (शेल्टर होम्स) राहत असलेले इस्रायलचे तरुण-तरुणी सेल्फी आणि फोटो फेसबुकवर पोस्ट करून अनुभव व्यक्त करत आहेत. त्यांनी फेसबुकवर 'बॉम्ब शेल्टर सेल्फीज' नावाचा एक ग्रुप बनवला आहे. फेसबुक पेज बनवणारी सारा इसेनचे म्हणणे आहे, की या परिस्थितीचा परिणाम त्यांच्यावर झालेला नाही असे आम्हाला लोकांना दाखवायचे आहे.
बॉम्ब शेल्टर सेल्फीज ग्रुपचा संदेश
या ग्रुपने या हल्ल्यादरम्यान जवळपास शेकडो छायाचित्रे घेऊन ती फेसबुकवर शेअर केली आहेत. या पेजच्या माध्यमातून त्यांना संदेश द्यायचे आहे, की वाईट परिस्थितीत त्यांना आनंदी राहायचे आहे. शेल्टरमध्ये राहून ते कसे मुलांचे मनोरंजन करत आहेत.
इंटरनेटवर टिका
ग्रुपवरील या छायाचित्रांची इंटनेटवर जोरदार टिका होत आहे. इंटरनेट यूजर्सचे म्हणणे आहे, की इस्रायल पॅलेस्टाइनींच्या मृत्यूची अवहेलना करत आहे. इस्रायल हवाई हल्ल्यादरम्यान ते शेल्टरमध्ये स्वत:ची रक्षा करू शकतील अशी पॅलेस्टाइनी महिला आणि मुलांकडे यांच्यासारखी सुविधा नाहीये.
पुढील स्लाइड्सवर पाहा फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आलेली छायाचित्रे...