आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्रायल देशाची राजधानी 'जेरुसलेम '

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील प्राचीन शहरांपैकी. पाच हजार वर्षांचा इतिहास शहराला आहे. लोकसंख्या व भौगोलिक पातळीवर जेरुसलेम इस्रायलमधील सर्वात मोठे शहर आहे. इस्लाम तसेच ख्रिश्चन धर्मीयांच्या दृष्टीने जेरुसलेम पवित्र मानले जाते. याच ठिकाणी भगवान येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवण्यात आले होते. जेरुसलेमवर इतिहासात 52 वेळा परकीय हल्ले झाले. एकेकाळी शहरात किंग डेव्हिडचे राज्य होते. 1981 मध्ये जुन्या शहराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. शहरातील पुतळे व काही पवित्र ठिकाणे ही इस्रायली-पॅलेस्टाइनमधील वादाचे विषय आहेत. जेरुसलेममध्ये नऊ टक्के लोक हे ज्यू आहेत. उद्यान, संग्रहालय, राष्ट्रीय ग्रंथालय, कॉन्व्हेंशन सेंटर, जेरुसलेम तंत्रज्ञान उद्यान ही ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून भेट देतात. जेरुसलेमची अर्थव्यवस्था धार्मिक पर्यटनावर अवलंबून आहे.
लोकसंख्या
10,29,000
(2011 नुसार)
हवाई अंतर
4,012 किमी (मुंबईपासून)