आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel Ex Foreign Minister Avigdor Lieberman Clean Chit For Corruption Case

भ्रष्टाचाराच्या आरोपातून लिबरमॅन मुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरूसलेम- इस्रायलचे माजी परराष्ट्रमंत्री अविग्दोर लिबरमॅन यांची न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. लिबरमॅन सत्ताधारी आघाडी सरकारमधील घटक पक्ष बेतेनू पार्टीचे अध्यक्ष आहेत.

न्यायालयाच्या निर्णयामुळे लिबरमॅन यांचा पुन्हा मंत्री होण्याचा मार्ग खुला झाला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्यासाठीच परराष्ट्रमंत्रिपद रिक्त ठेवले होते. आपल्याविरुद्धच्या चौकशीसाठी सौदेबाजी केल्याचा लिबरमॅन (55) यांच्यावर आरोप होता. सौदेबाजी करताना लिबरमॅन यांनी माजी राजदूत जेव्ह बेन आर्ये यांना बढती दिली होती.