आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel Extends Casefire At Gaza Strip For 24 Hours, Divya Marathi

इस्रायलने गाझापट्टीवरील युध्‍दविराम 24 तासांनी वाढवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा- इस्रायलने रविवारी(ता. 27) संयुक्त राष्‍ट्राच्या विनंतीवरून गाझावरील युध्‍दविराम आखणी 24 तासांनी वाढवले. गाझापट्टीवरील रणगाडे मागे घेतल्याशिवाय इस्रायलने घेतलेला निर्णय पूर्ण यशस्वी होणार नाही, असे हमासने म्हटले आहे. शनिवारी रात्री इस्रायलच्या मंत्रिमंडळाची पॅलेस्टाइनबाबत बैठक पार पडली. यात युध्‍दविराम रविवार(ता.27) मध्‍यरात्रीपर्यंत वाढवण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. जर पॅलेस्टाइन दहशतवाद्यांनी कायदा मोडण्‍याचा प्रयत्न केल्यास सैन्य आपली कारवाई सुरू करेल, असा इशारा इस्रायलने दिला आहे.
लष्‍करी कारवाई संदर्भात रविवारी चर्चा करण्‍यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्‍यात आली होती. इस्रायल जो पर्यंत आपले रणगाडे गाझापट्टीवरून हटवत नाही. नागरिकांना आपापल्या घरी जाण्‍याची मुभा देत नाही आणि मृतदेह रूग्णवाहकीने नेण्‍याची परवानगी देत नाही, तो पर्यंत शस्त्रसंधी हे फक्त नाटक आहे, असे हमासने आपल्या प्रसिध्‍दीपत्रकात म्हटले आहे. इस्रायल आणि हमास मध्‍ये शनिवारी 12 तासांकरिता युध्‍दविरामाची घोषण करण्‍यात आली.

शस्त्रसंधी दरम्यान हमासने बोगद्यांचा वापर केला तर त्यांच्याविरूध्‍द कारवाई केली जाईल, असे इस्रायलने स्पष्‍ट केले आहे. 12 तासांच्या युध्‍दविराम करारच्या समाप्तीनंतर गाझापट्टीतून क्षेपणास्त्रांचा इस्रायलवर हमासने मार केला. पुढील हल्ल्याच्या तयारीसाठी इस्रायल शस्त्रसंधीचा वापर करत आहे, असा हमासने आरोप केला आहे.