आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel, Hamas Agree On 12 hour Ceasefire In Gaza News In Marathi

गाझापट्टीतील हिंसाचार 12 तासांसाठी थांबला, इस्रायल-हमासची अखेर शस्त्रसंधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेरुसलेम- शनिवार सकाळपासून 12 तासांसाठी युद्धबंदी करण्यावर इस्रायलचे लष्कर आणि हमास नेत्यांचे एकमत झाले आहे. यापूर्वी वेस्ट बॅंकमध्ये ताजा हिंसाचार उफाळून आला असून इस्रायली लष्काराच्या कारवाईत सहा पॅलेस्टाईन नागरिक ठार झाल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाकडून इस्रायलवर दबाव टाकला जात आहे. इस्रायल आणि हमासने शस्त्रसंधी करावी यासाठी अनेक देशांकडून प्रयत्न केले जात आहेत.
गाझापट्टीत सात दिवसांची शस्त्रसंधी जाहीर करावी असा प्रस्ताव अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी इस्रायली सरकारसमोर ठेवला होता. परंतु, इस्रायल सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर इस्रायलच्या लष्कराने 12 तासांसाठी युद्धबंदी करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर इस्रायली सरकारने चर्चेसाठी दारे उघडी असल्याचे संकेत दिले आहेत. सरकारने सांगितले आहे, की आम्ही केरी यांच्यासोबत मिळून काम करणार आहोत.
इस्रायली मीडियाकडून मिळालेल्या वृत्तानुसार, 12 तासांच्या शस्त्रसंधीसाठी हमासनेही अनुकूलता दर्शवली आहे. परंतु, इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे, की हमास वापरत असलेले टनल नष्ट करण्याची कारवाई या शस्त्रसंधीनंतर सुरू राहिल. गाझापट्टीवरील नागरिकांना घरे रिकामे करण्यास सांगितले आहे. त्यांनी सध्याच परत येऊ नये. इस्रायली नागरिकांवर हल्ले झाले तर त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल.