जेरुसलेम -
इस्रायलने गाझा मोहिमेवरील लष्करी तैनातीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आणखी 16 हजार सैन्य सज्ज ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हमास विरुद्धच्या युद्धात इस्रायलच्या लष्करी सैन्याचा आकडा 86 हजारांवर पोहोचला आहे. बुधवारी सायंकाळी इस्रायलच्या सुरक्षाविषयक कॅबिनेटने दिलेल्या परवानगीनंतर लष्करी तैनातीचा मार्ग मोकळा झाला आहे.
देशाने सुरुवातीच्या टप्प्यात हवाई हल्ल्यावर भर दिला होता. त्यानंतर हमासशी लष्करी सैन्याद्वारे लढण्याचा निर्णय घेतला होता. हमास विरोधातील मोहिमेचा गुरुवारी चोविसावा दिवस होता.