आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel Hamas News In Marathi, Gaza Strip, Divya Marathi

इस्रायल-हमास यांच्यातील युध्‍दबंदी संपली, मुदतवाढीला हमासचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा / कैरो - इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीची मुदत गुरुवारी संपली. मुदतवाढीची इस्रायलने तयारी दर्शवली असली तरी हमासने मात्र तशी सहमती झाली नसल्याचे सांगून बोटे अजूनही ट्रिगरवर असल्याचा इशाराही दिला आहे. इस्रालय आणि पॅलेस्टाइनवादी दहशतवादी संघटनेमध्ये इजिप्तच्या मध्यस्थीने मंगळवारपासून तीन दिवसांची युद्धबंदी लागू करण्यात आली होती.
गुरुवारी युद्धबंदीचा तिसरा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर इस्रायलने युद्धबंदीची मुदत वाढवण्यास विनाशर्त तयारी दाखवली आहे. परंतु हमासचा दुसर्‍या क्रमांकाचा म्होरक्या मुसा अबू मझरुकने युद्धबंदीची मुदत वाढवण्यात आल्याचा दावा फेटाळून लावला. अशा प्रकारची कोणतीही सहमती झालेली नाही. तसा करार झाला नाही. मझरुकने ट्विट करून ही माहिती दिली. दरम्यान, इस्रायल-हमास संघर्षात एक महिन्यात 1 हजार 900 पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झाला. इस्रायलचे 67 जण ठार झाले. मृतांत सैनिकांचा समावेश आहे.

मागण्या मान्य करा : इस्रायलने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा पुन्हा हल्ले सुरू करण्यात येतील, असा इशारा हमासने बुधवारी रात्री दिला होता. वेस्ट बँकमध्ये अटक करण्यात आलेल्या सर्व कैद्यांची सुटका आणि सुरक्षेचा घेराव काढून टाकण्यात यावा, अशीही हमासची मागणी आहे.

पुढे वाचा हमासची बोटे ट्रिगरवरच.....