आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel Hamas News Story In Marathi, Divya Marahti

इस्रायलला हवे गाझावर वर्चस्व, त्याला साथ महासत्ता अमेरिकेची, वाचा कुटनिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्रायल-हमासमध्‍ये सध्‍या चालू असलेला संघर्ष जगभरात चर्चिला जात आहे. त्यास 8 जुलैपासून सुरूवात झाली. कारण होते, तीन इस्रायली तरुणांची हत्या. मागील आठवड्यात माध्‍यमांमध्‍ये शस्त्रसंधीच्या बातम्या आल्या. पण काही तास उलटताच पुन्हा युध्‍द सुरू झाले. शस्त्रसंधी-युध्‍द असा सापशिडीचा खेळ सध्‍या गाझापट्टीवर चालू आहे.
इस्रायलचा इतक्या शर्तीने गाझापट्टीवर जो तांडव चालू आहे त्यामागे आहे महासत्ता अमेरिका. अमेरिकाच या देशाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करित आहे. सत्ता संतुलनाच्या उद्देशाने हे सर्व घडत आहे. इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत 1 हजार 804 नागरिकांचा बळी गेला आहे. 3 हजार लोकांचे घरे उदध्‍वस्त झाली आहेत, असे गाझाच्या अधिका-यांनी सांगितले आहे.
या सर्व घडामोडीतून जास्तीत- जास्त पॅलेस्टाइन नागरिकांना मेटाकूटीस आणायचे आणि संपूर्ण गाझावर वर्चस्व प्रस्थापित करायचे, हा उद्देश इस्रायलचा दिसून येतो. तसेच हमास या दहशतवादी संघटनेने खोदलेली बोगदे नष्‍ट करायचे आहे.
पुढे वाचा इस्रायल-हमास संघर्षामागील पार्श्‍वभूमी आणि संयुक्त राष्‍ट्र या संघर्षाबाबत काय म्हणते...