आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाख पॅलेस्टिनी नागरिक बेघर; दिवसांच्या लढाईत 583 जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा/जेरुसलेम- इस्रायल लष्कर आणि हमासमधील संघर्ष सुरूच असून लढाईत मंगळवारी आणखी सात जणांचा मृत्यू झाला. मागील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या लढाईत 583 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून इस्रायल लष्करातील 27 जवान मृत्युमुखी पडले आहेत. तसेच एक लाखाहून अधिक लोक बेघर झाले आहेत. कतार व इजिप्तकडून युद्धबंदीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

इस्रायल लष्कराने नुकताच एका रुग्णालयावर हल्ला केला असून यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर 70 जण जखमी झाले. या रुग्णालयात क्षेपणास्त्रविरोधी रणगाडे ठेवल्याच्या संशयावरून हा हल्ला घडवण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या लष्करी अधिकार्‍यांनी दिली. गाझा पट्टीवरील आणखी एका हल्ल्यात दोन 30 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. मंगळवारी या संघर्षात 9 इस्रायली जवानांचा मृत्यू झाला.

गाझा पट्टीत कार्यरत संयुक्त राष्ट्र संघ संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एक लाखाहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे मोठे आव्हान आहे. इस्राइलच्या सीमेवर मंगळवारी 131 रॉकेट हल्ले झाले. त्यापैकी 108 रॉकेट इस्रायलमध्येच पडले. या हल्ल्यांत जीवितहानी झाली नाही. गाझा पट्टीवरील संकट संपुष्टात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न सुरू असून लवकरच कैरो येथे युद्धबंदीची घोषणा केली जाईल.

संघर्षविरामाची घोषणा
हमासचे नेता खालिद मशाल युद्धबंदीची घोषणा करण्यासाठी कैरो येथे पोहोचतील. मशाल यांनी काल कतार येथे पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष मेहमूद अब्बास यांच्याशी युद्धबंदीविषयक चर्चा केली होती. या चर्चेत अब्बास यांनी इजिप्तच्या युद्धबंदीविषयक प्रस्तावाचा आग्रह धरला होता.