आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel Send Industralists Team, Promise To Participate In Make In India

इस्रायल पाठवणार उद्योजकांची टीम, मेक इन इंडिया कार्यक्रमात भागीदारीचे आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेरुसलेम - इस्रायलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया कार्यक्रमात भागीदारीचे आश्वासन दिले आहे. यासाठी इस्रायल लवकरच उद्योजकांची एक टीम भारतात पाठवणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी तसे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना दिले आहे.

सिंह यांनी नेत्यानाहू यांच्याशी तासभर चर्चा केली. मोदी आणि नेत्यानाहू यांची सप्टेंबरमध्ये अमेरिकेत भेट झाली होती. नेत्यानाहू यांनी सांगितले, मोदी यांच्या योजना प्रभावित करणा-या आहेत. दहशतवाद आणि सायबर गुन्हे क्षेत्रातील वाढत्या जागतिक धोक्याचा सामना करण्यासाठी दोन्ही देश एकत्रित प्रयत्न करतील. इस्रायलने संरक्षण आणि उद्योग क्षेत्रात मदतीसाठी हात पुढे केला आहे.

या क्षेत्रात इस्रायल करणार मदत
* संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक
* सार्वजनिक वाहतूक
क्षेत्र
* सीमा सुरक्षा क्षेत्र
* उत्पादन खर्च कमी राखण्याचे क्षेत्र