आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel Strike Gaza Death Toll Crossed 500, Divya Marathi

इस्रायलच्या हल्ल्यात मृतांची संख्‍या गेली 500 वर, 10 दहशतवादी ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इस्रायली हल्ल्यात मारला गेलेल्या मुलाला पुरण्‍यासाठी घेऊन जाताना व्यक्ति.) - Divya Marathi
(इस्रायली हल्ल्यात मारला गेलेल्या मुलाला पुरण्‍यासाठी घेऊन जाताना व्यक्ति.)
जेरूसलम/गाझा - इस्रायल सैन्यांने हमासचे 10 दहशतवाद्यांना मृत्यूमुखी पाडले आहे. ती सर्व गुप्त मार्गाच्या मदतीने गाझापट्टीतून इस्रायलमध्‍ये प्रवेश करण्‍याचा प्रयत्न करत होती. आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात 500 लोक मारली गेली आहेत. युनोच्या इशा-यानंतरही इस्रायलने गाझापट्टीवर हल्ले चालूच ठेवले आहे.रविवारी( ता.20) रॉकेट हल्ल्यात एकाच परिवाराची 25 लोक मारली गेली. 8 जुलैपासून सुरू झालेल्या संघर्षात मोठ्याप्रमाणावर सर्वसामान्य नागरिक मारली गेली आहेत. आमचे दोन नागरिकांसहित 18 सैनिक मारली गेली आहेत, असे इस्रायलने सांगितले.

न्यूयॉर्कमध्‍ये बैठक
रविवारी(ता. 20) न्युयॉर्कमध्‍ये इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाबाबत युनोच्या सुरक्षे परिषदेची बैठक पार पडली. 15 सदस्य संख्‍या असलेल्या परिषदेत नाहक बळी ठरत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांबाबत चिंता व्यक्त करण्‍यात आली आहे.

एका इस्रायली सैनिकाला पकडण्‍यात आले....
एका इस्रायली सैनिकाला पकडण्‍यात आले आहे, असे हमासच्या अबु उबैदा यांनी सांगितले आहे. पकडण्‍यात आलेल्या सैनिकाचे नाव शौल अ‍ॅरोन सांगण्‍यात आले असून त्याचा टॅग क्रमांक सांगण्‍यात आलेला आहे. या व्यतिरिक्त दहशतवाद्यांनी इतर पुरावे दिलेले नाही. ज्यामुळे इस्लामी दहशतवाद्यांनी सैनिकाला पकडले असल्याचे खात्री होईल.
पुढे पाहा इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाशी सं‍बंधित इतर छायाचित्रे....