आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel Track 23 Tunnels Used For Terror Attacks In Gaza

PHOTOS: इस्त्रायलच्या जोरदार हल्ल्यांमुळे 60 लाख लोकांच्या जीवास धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गाझा पट्टीवर रॉकेट हल्ला करणारे इस्त्रायलचे अपाचे हॅलिकॉप्टर)

जेरूसलम - इस्त्रायलकडून होत असलेल्या रॉकेट हल्ल्यांमुळे जवळपास 60 लाख लोकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. इस्त्रायलने केलेल्या सैन्य कार्यवाईत गाझापट्टीमध्ये बनण्यात आलेल्या 23 गोपनिय मार्गांचा शोध लागला आहे. हमास या गुप्त मार्गांचा उपयोग इस्त्रायलविरोधात दहशतवादी हल्ल्यांसाठी करत होता. इस्त्रायल राजदूताने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायल संरक्षण दलातर्फे सुरू असलेल्या जमिनी कारवाईत 17 जुलैला या गुप्त मार्गांचा शोध लागला.
इस्त्रायल राजदूताकडून जाहिर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गाझापट्टीमध्ये राहणार्‍या लोकांच्या सुरक्षेसंदर्भात इस्त्रायलकडून सर्वप्रकारे महत्त्वाची पाऊले उचलली जात आहेत. आम्ही या परिस्थितीला कसे थांबवता येईल याबद्दलही प्रयत्न केले आहेत. मात्र हमासकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आम्हाला सतत रॉकेटने हल्ले करावे लागत आहेत.
पॅलेस्टाईन नागरिक आणि शहरांच्या सुरक्षेसाठी आम्ही एक खास अभियान चालु केले आहे. आम्हाला हे युध्द संपवायचे आहे. या हिंसाचाराचा शेवट व्हावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. मग हा निर्णय सैन्याच्या रुपाने असो अथवा रासायनिक स्वरुपाचा आम्ही यावरून हटणार नाही, असेही सांगितले आहे.
माध्यमांकडून मिळालेल्या अहवालानुसार, मागील 14 दिवसांमध्ये झालेल्या हिंसाचारात आता पर्यंत पॅलेस्टाईनचे 600 पेक्षा जास्त तर 30 इस्त्रायल नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
संयुक्त राष्ट्राचे प्रमुख बान-की मून आणि अमेरिकेचे विदेश मंत्री जॉन केरी सध्या कैरोमध्ये गाझातील युध्द संपवण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. बान-की मून यांनी इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनसोबत चर्चेच्यामाध्यमातून हे युध्द संपवण्यास सांगितले आहे.

पुढील छायाचित्रांमध्ये पाहा, गाझा पट्टीमध्ये बनवण्यात आलेला गुप्तमार्ग....