जेरूसलेम -
इस्रायलने मंगळवारी (ता. 5) आपले सैन्य गाझावरून हटवले. वाढत चाललेल्या जागतिक दबावापुढे झुकत इस्रायलने 72 तासांची शस्त्रसंधी कराराच्या अंमलबजावणीकडे जास्त भर दिला आहे. तत्पूर्वी इस्रायली लष्कर आणि हमासने आपापले शक्तीप्रदर्शन एकमेंकांना दाखवले.
मोठ्याने जेरूसलेम, तेल अवीव, उत्तर आणि दक्षिण इस्रायलमध्ये सायरन वाजवण्यात आले. हमासने सीमावर्ती भागात 16 क्षेपणास्त्रांचा मारा केला. यातील एक पॅलेस्टाइनमधील वेस्ट बॅक सिटी बेथलेहेममध्ये आदळले. मात्र यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. गाझामध्ये इस्रायली युध्द विमानांनी पाच हवाई हल्ले केले केले. हल्ल्यात कोणाचाही बळी गेलेला नाही. हे सर्व इस्रायलने आपले गाझापट्टीवरून सैन्य माघारी घेतल्याने आकाश स्तब्ध झाला आहे, असे एका वृत्तसंस्थेच्या वार्ताहराने सांगितले.